‘धनुष्यबाण गोठवण्याची वेळ तुम्हीच आणली’; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीआधी संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत ‘आता नाही तर कधीच नाही’ असा दावा केला.

Published On: 

Sanjay Raut on Shivsena symbol case

Shivsena Symbol Case : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह यांबाबतची सुनावणी सुरू होत आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील आज आपली बाजू मांडण्यास सुरुवात करतील. त्यापूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही महत्त्वपूर्ण विधाने केली.

“याआधी तीन वर्षात निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांनी भाजप खासकरुन अमित शाहंच्या दबावाखाली निर्णय घेतला. आता अमित शाह स्वत: दबावाखाली आहेत. अमित शाह यापुढे मंत्रिमंडळात राहतील की नाही असं वातावरण दिल्लीत याक्षणी आहे.” असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Shivsena symbol case

“त्यामुळे ही जी काही सुनावणी सुरू आहे. भारतीय संविधानासंदर्भात, संविधानाच्या प्रतिष्ठेसाठीची अंतिम लढाई आहे. आता नाही तर कधीच नाही. शिवसेनेच्यावतीने आमचं म्हणणं जे मांडायचं होतं ते मांडून पूर्ण झालेलं आहे. सिबल, कामत यांनी धुवाधार युक्तीवाद केला. बेकायदेशीर निर्णयाच्या चिंधड्या उडवल्या” असे संजय राऊत यांनी सांगितले.

शिंदे गटाच्या बाजूने सुरू होणाऱ्या सुनावणीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “सात ते आठ दिवस यांची सुनावणी चालेल. त्यांचे म्हणणे त्यांचे वकिल मांडतील. काही हरकत नाही. शेवटी न्यायालय खंडपीठ, घटनापीठ म्हणतात संविधानाच्या चौकटीत राहूनच त्यांना निर्णय द्यावा लागेल. कोणत्याही दबावाशिवाय हा निर्णय येईल. देशाला एक ऐतिहासिक स्वच्छ, निर्णय मिळेल. देशाच्या राजकारणात पक्षांतर होतील की नाही असा एक निकाल अपेक्षित आहे.”

“कॅबिनेटची बैठक टाकून उपमुख्यमंत्री वारंवार बाहेर जातात. राज्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न पडलेले आहेत, समस्या आहेत, लोकं रस्त्यावर आहेत. आदिवासी रस्त्यावर आहे, मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन निर्माण केले आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री दरेगाव, दिल्लीत जाऊन काय करतात? हा गंभीर प्रश्न आहे. ते स्वत: कोर्टात उभे राहणार का? सत्याच्या बाजूने निकाल लागेल. संविधानाचा विजय होईल” असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला.

‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याची मागणी दुर्दैवी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “अत्यंत बरोबर बोलतायत ते. धनुष्यबाण गोठवण्याची वेळ कोणी आणली? या चोरांनीच आणली. लुटलं कोणी? अमित शाह डाकू आहे. मी जबाबदारीने बोलतोय. या डाकूंच्या मदतीने, भाजपच्या डाकूच्या सरदाराच्या मदतीने बाळासाहेबांना पवित्र असलेला धनुष्यबाण चोरला, डाका घातला”

“डाका घालून निवडणुका लढताय. आधी काय केलं पाहिजे, मुद्देमाल जप्त केला पाहिजे. शिंदेंना कायदा कळतो का? आधी मुद्देमाल जप्त करावा लागेल. मुद्देमाल जप्त केल्यावर निर्णय येईल. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची वेळ शिंदेंनी आणली. निकाल लागेल त्यावेळी शिंदेंना आयुष्यभर लाज वाटेल. ही चिन्ह गोठवण्याची मागणी करण्याचीवेळ तुमच्यामुळे आली आहे.” अशी घणाघाती टीका राऊत यांनी शिंदेंवर केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही