Amit Thackeray: अमित ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असताना महाविद्यालयातून पंतप्रधानांचा फोटो खाली उतरवल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता या संपूर्ण वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेत प्रशासनाला आणि विरोधकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ‘पंतप्रधानांचा फोटो लावण्याला विरोध नाही, पण त्यांची जागा कोणती हे आधी ठरवा,’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात (Government Polytechnic) अमित ठाकरे नुकतेच विद्यार्थ्यांशी संवाद साधायला गेले होते. तिथे मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्या रांगेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला होता. हे पाहताच अमित ठाकरेंनी मुख्याध्यापकांना जाब विचारला आणि पुढच्याच क्षणी मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो तिथून हटवला. या घटनेनंतर अमित ठाकरेंसह २५ जणांवर गुन्हे दाखल झाले आणि प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे यांसह तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकही केली.
Raj Thackeray speaking on PM Modi photo controversy
‘ती’ चूक आत्ताच सुधारून घ्या! राज ठाकरेंचा थेट इशारा
या सगळ्या वादानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “सरकारी कार्यालयांमध्ये देशाच्या पंतप्रधानांचा फोटो असायलाच हवा, त्यात कोणतेही दुमत नाही. आपले त्यांच्याशी शंभर राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवटी ते देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांचा फोटो दुसऱ्या भिंतीवर असायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रांगेत इतर कुणालाही बसवता येणार नाही. मोदींच्या फोटोला राज ठाकरेंचा विरोध नाही, पण ज्या ठिकाणी तो लावला गेला, त्यावर त्यांचा तीव्र आक्षेप आहे.
त्यामुळेच, शाळा असोत वा इतर कोणतीही सरकारी कार्यालये, त्यांनी कोणत्या रांगेत कोणाचे फोटो लावायचे, याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे राज ठाकरेंनी सुनावले. “हे मला वाटतं कोर्टामध्ये देखील कळलं पाहिजे आणि इतर शैक्षणिक आणि आस्थापनांमध्ये देखील कळलं पाहिजे, त्यामुळे आत्ताच सुधारून घ्या,” असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
दुसरीकडे, अमित ठाकरेंनीही याआधीच आपल्या कृतीचे ठामपणे समर्थन केले आहे. “नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांशी कधीच होऊ शकत नाही. महाराजांच्या अपमानासाठी जर माझ्यावर गुन्हे दाखल होत असतील, तर मला त्याचा अभिमानच आहे,” अशी भूमिका अमित ठाकरेंनी मांडली होती.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी या कृत्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. पण आता राज ठाकरेंच्या या थेट आणि आक्रमक इशाऱ्यानंतर भाजप नेते काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीच्या मित्राला बेड्या, तपासात धक्कादायक खुलासे
- iPhone 17 Discount: फ्लिपकार्टवर बंपर ऑफर, ८२ हजारांचा आयफोन ५४ हजारांच्या खाली!
- हरमनप्रीत कौरने रचला नवा इतिहास, पाकिस्तानचा धुव्वा उडवूनही विरोधी संघाचं कौतुक का केलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











