iPhone 17 Discount: ॲपलच्या प्रीमियम स्मार्टफोन्सची भुरळ सर्वांनाच असते, पण त्याची तगडी किंमत अनेकांचं बजेट कोलमडते. मात्र, आता आयफोन खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न साकार होऊ शकतं. फ्लिपकार्टवर सध्या आयफोन १७ (iPhone 17) वर अशी काही भन्नाट ऑफर आली आहे की, ८२ हजारांचा हा फोन थेट ५४ हजार रुपयांच्या खाली मिळत आहे. त्यामुळेच, नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
मूळ किंमत ८२,९०० रुपये असलेला आयफोन १७ (२५६ जीबी) फ्लिपकार्टवर मर्यादित काळासाठी ५३,८१७ रुपयांना उपलब्ध झाला आहे. अर्थात, ही कोणतीही सरसकट सवलत नाही, तर हा आकडा गाठण्यासाठी तुम्हाला बँक ऑफर आणि जुना फोन एक्सचेंज करावा लागणार आहे. या डीलमध्ये तुम्हाला थेट २,००० रुपयांची सूट मिळत असून, फ्लिपकार्ट अॅक्सिस किंवा एसबीआय क्रेडिट कार्डवर ४,८३३ रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे.
iPhone 17 Discount offer on Flipkart
iPhone 17 Offers: असा मिळवा तब्बल २२ हजारांचा एक्सचेंज बोनस
या फोनची किंमत ५३,८१७ रुपयांपर्यंत खाली आणण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो एक्सचेंज ऑफरचा. जर तुमच्याकडे जुना आयफोन १३ (१२८ जीबी) चांगल्या स्थितीत असेल, तर त्यावर तब्बल २२,२५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हे सर्व डिस्काउंट एकत्र केल्यावर तुम्हाला हा नवा आयफोन अतिशय स्वस्तात पडेल. मात्र, जुन्या फोनची स्क्रीन किंवा बॉडी खराब असेल, तर एक्सचेंज व्हॅल्यू कमी होऊ शकते, हे ग्राहकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
आयफोन १७ च्या फीचर्सबद्दल सांगायचं तर, यात ६.३ इंचाचा १२० हर्ट्झ प्रोमोशन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो खूप स्मूथ एक्सपिरियन्स देतो. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप असून, ए१९ (A19) चिपमुळे याचा परफॉर्मन्स अत्यंत वेगवान आणि बॅटरी बॅकअप उत्तम आहे. विशेष म्हणजे, हा फोन ‘अॅपल इंटेलिजन्स’ या एआय फीचर्सला सपोर्ट करतो आणि सुरक्षेसाठी यात सिरॅमिक शील्ड २ चं कोटिंग देण्यात आलं आहे.
दुसरीकडे, ९ सप्टेंबर रोजी अॅपलचा सर्वात मोठा लाँच इव्हेंट पार पडणार आहे. या इव्हेंटकडे संपूर्ण टेक विश्वाचं लक्ष लागलं आहे, कारण यात अॅपल आपला पहिला ‘फोल्डेबल आयफोन’ (Foldable iPhone) सादर करण्याची शक्यता आहे. बाजारात मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या तुटवड्यामुळे स्मार्टफोनच्या किमती वाढत असताना, फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या मागणीत मात्र लक्षणीय वाढ होत आहे. एका संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, २०२७ पर्यंत अॅपल १७ दशलक्षहून अधिक फोल्डेबल आयफोन विकू शकते. त्यामुळे, हा नवीन फोन कंपनीसाठी गेमचेंजर ठरू शकतो.
विशेष म्हणजे, अॅपलच्या व्यवस्थापनात नुकताच मोठा बदल झाला आहे. १ सप्टेंबरपासून टिम कुक यांच्यानंतर जॉन टर्नस (John Ternus) यांनी कंपनीच्या सीईओ (CEO) पदाची धुरा हाती घेतली आहे. जॉन हे गेल्या अनेक वर्षांपासून अॅपलचे हार्डवेअर चीफ म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मोठा इव्हेंट असल्याने याकडे गुंतवणूकदारांच्याही नजरा खिळल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर, एका बाजूला आयफोन १७ वरील बंपर डिस्काउंट आणि दुसऱ्या बाजूला नवीन फोल्डेबल फोनची उत्सुकता, यामुळे सध्या टेक विश्वात अॅपलचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट: जेलमधील ‘त्या’ १०० दिवसांत विषप्रयोग? राहुल गांधींचा गंभीर इशारा
- झी चे संस्थापक सुभाष चंद्रांच्या अडचणीत वाढ; १३२२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने केला गुन्हा दाखल
- प्राजक्ता माळीने सोडलं मौन, लग्नाच्या दबावावर आणि घरच्यांच्या अपेक्षांवर अखेर स्पष्टच बोलली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











