Share

हरमनप्रीत कौरने रचला नवा इतिहास, पाकिस्तानचा धुव्वा उडवूनही विरोधी संघाचं कौतुक का केलं?

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौर १५० टी-२० सामने खेळणारी जगातील पहिली कर्णधार ठरली आहे.

Published On: 

Harmanpreet Kaur indian women cricket team captain in match against pakistan

भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की मैदानावर अटीतटीची झुंज पाहायला मिळते. पण, महिला आशिया कप २०२६ च्या (Womens Asia Cup 2026) बहुचर्चित सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा उडवला. भारताने हा सामना एकतर्फी जिंकला असला, तरी कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सामन्यानंतर चक्क पाकिस्तानी गोलंदाजांचं कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या सामन्यात श्री चरणी, प्रेमा रावत, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या भारतीय फिरकीपटूंनी कमालच केली. त्यांच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ टी-२० मधील सर्वात नीचांकी म्हणजेच अवघ्या ५५ धावांवर गारद झाला. हे छोटेखानी टार्गेट टीम इंडियाने केवळ ८.४ षटकांतच पार करत मोठा विजय मिळवला.

Harmanpreet Kaur Record 

सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीतने संघाच्या आक्रमक खेळावर समाधान व्यक्त केलं. “हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. गोलंदाजांनी खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत रणनीतीची योग्य अंमलबजावणी केली,” असं ती म्हणाली. विजयासाठी ५६ धावांचं सोपं आव्हान पार करताना भारताने तीन विकेट्स गमावले. याबद्दल विचारलं असता ती म्हणाली, “क्रिकेटमध्ये असं होऊ शकतं. पाकिस्तानकडे खरोखरच एक चांगला गोलंदाजीचा मारा आहे.”

थोडक्यात सांगायचं तर, हा विजय हरमनप्रीतसाठी वैयक्तिक पातळीवरही खूप खास ठरला आहे. कर्णधार म्हणून ती आपला १५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळत होती. विशेष म्हणजे, पुरुष आणि महिला क्रिकेटच्या इतिहासात असा टप्पा गाठणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

या ऐतिहासिक विक्रमावर बोलताना, इथवर मजल मारेन असं कधीच वाटलं नव्हतं, अशी प्रांजळ कबुली तिने दिली. भारतीय महिला संघाने आतापर्यंत खेळलेल्या एकूण २२८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी तब्बल २०५ सामन्यांमध्ये हरमनप्रीतचा सहभाग आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही