Share

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीच्या मित्राला बेड्या, तपासात धक्कादायक खुलासे

केतन अग्रवाल हत्येप्रकरणात मुख्य आरोपींचा मित्र रितेश हांगे याला अटक करण्यात आली असून, त्याला हत्येच्या कटाची पूर्वकल्पना असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Published On: 

Pune Police investigating Ketan Agarwal murder case at Lohagad fort

पुणे – केतन अग्रवाल यांच्या लोहगड येथील हत्येप्रकरणात 9Ketan Agarwal Murder) आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांना अटक झाल्यानंतर, आता चेतनचा जिवलग मित्र रितेश हांगे यालाही पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येच्या संपूर्ण कटाची रितेशला केवळ पूर्वकल्पनाच नव्हती, तर प्लॅनिंगमध्येही त्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना किती भयानक होती, याचे सत्य आता उलगडू लागले आहे.

मूळचा बीडचा असलेला आणि सध्या बालेवाडीत एका खासगी कंपनीत नोकरी करणारा २२ वर्षीय रितेश हांगे हा चेतनचा जुना मित्र आहे. लोहगडवर केतनला दरीत ढकलून देण्यापूर्वी सिया आणि चेतनने रितेशसोबत हत्येच्या प्लॅनिंगबाबत सविस्तर चर्चा केली होती. एवढंच नाही, तर त्यालाही लोहगडवर सोबत येण्याची गळ या दोघांनी घातली होती, मात्र त्याने नकार दिला होता. पोलिसांच्या मते, रितेशला या आधीच्या प्लॅनचीही माहिती होती, ज्यामध्ये केतनचे हात-पाय मोडून त्याला मारण्याचा कट होता. या प्रकरणी वडगाव मावळ न्यायालयाने रितेशला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली आहे.

Ketan Agarwal murder case at Lohagad fort Pune

डिलीट केलेले चॅट्स आणि कटाची ती ‘सिग्नल’ थिअरी

पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी केतनची हत्या थंड डोक्याने करण्यात आली. लोहगडवर गेल्यावर सियाला केतनच्या टप्प्याबाहेर राहायचे होते. त्यामुळे तिने खाली बसण्याची (पाणी पिण्याच्या किंवा शूजची लेस बांधण्याच्या बहाण्याने) वेळ निश्चित केली होती. हाच तो ‘सिग्नल’ होता ज्याची वाट चेतन पाहत होता. सिया खाली बसताच चेतनने मागून येऊन केतनला थेट दरीत ढकलले. हत्येनंतर या दोघांनी मोबाईलमधील चॅट हिस्ट्री आणि रिसायकल बिन पूर्णपणे डिलीट केले होते. मात्र, फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने डेटा रिकव्हर करण्यात आला आणि त्यातूनच रितेशचा या कटातील सहभाग उघडकीस आला.

या घटनेनंतर चेतनने रितेशची थेट भेट घेतल्याचे तसेच सियासुद्धा त्याच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे, बचाव पथकातील सुनील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला तेव्हा त्याची अवस्था अत्यंत विदारक होती. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कवटीचा चक्काचूर झाला होता. विशेष म्हणजे, घटनास्थळी इतर नागरिक भावुक झालेले असताना सिया मात्र अत्यंत शांत होती, तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दुःख नव्हते. एका प्रेयसीनेच प्रियकराच्या मदतीने हत्येचा एवढा भयंकर कट कसा रचला, याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही