Share

राहुल गांधींच्या ‘अंधभक्त’ विधानाने संसदेत खळबळ; राजनाथ सिंहांचा तीव्र आक्षेप

अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.

Published On: 

Rahul Gandhi

दिल्ली : लोकसभेत ‘पेपर लीक’ विरोधी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज या चर्चेत सहभाग घेतला. मात्र, त्यांच्या भाषणाच्या पहिल्या पाच मिनिटांतच सभागृहात मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकांचे तीन गटांत वर्गीकरण केले, ‘विद्यार्थी (Student)’, ‘मूर्ख’ (idiots) आणि ‘अंधभक्त (blind followers)’. सभागृहातील सदस्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी हा शब्द असंसदीय नसल्याचा युक्तिवाद करत भाषण पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

एका विद्यार्थ्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत राहुल गांधींनी विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त या तीन गटांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की ‘अंधभक्त’ हा तिसरा गट आहे आणि दावा केला की हा गट एका मूर्ख व्यक्तीचे अनुकरण करतो. या विधानामुळे सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला. किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप केला आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप केला आणि राहुल गांधींचे शब्द असंसदीय घोषित करून कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी तीन गटांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित केले, परंतु त्या गटांची स्पष्ट नावे न घेता आपले भाषण पुढे चालू ठेवले.

मी त्या विद्यार्थ्याला विचारले…

मी विद्यार्थ्यांचे विचार मांडत आहे. विद्यार्थी सत्याचा शोध घेतात. गांधीजींनी म्हटले होते की, घराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून सर्व प्रकारची हवा आत येऊ शकेल. मी विद्यार्थ्यांना विचारले, “‘मूर्ख’ (idiots) लोकांबद्दल तुमचे काय मत आहे? जे विद्यार्थी नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?” त्यावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिले, “विद्यार्थी नेहमी अभिमानाने सत्याची बाजू घेतात. दुसऱ्या प्रकारचे लोक आपल्या इमेजची चिंता करतात. ‘मूर्ख’ व्यक्ती केवळ आपल्या ‘देवावर’ विश्वास ठेवते आणि त्या उद्देशासाठी स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करते,” असे राहुल गांधी म्हणाले.

विद्यार्थ्यांना माहित आहे…

माझी काही विद्यार्थ्यांशी चर्चा झाली. त्यांनी एक दृष्टिकोन मांडला. मी एका मुलीला विचारले, “तू विद्यार्थिनी आहेस, याचा अर्थ काय?” तिने अत्यंत सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, ज्याचा मेंदू खुला असतो, आपल्याला काहीच माहीत नाही, हे तो जाणतो, त्यालाच विद्यार्थी म्हणतात.” अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांना जाणीव असते की जग बदलत आहे.” हाच मुद्दा राहुल गांधी यांनी मांडला.

मोदींमध्ये हिंमत नाही

आज लोकसभेत चर्चा सुरू असतानाही पंतप्रधान सभागृहात उपस्थित नाहीत. राहुल गांधींनी यावरून जोरदार टीका केली. मोदींमध्ये सभागृहात बसण्याची हिंमत नाही. येऊन आपली जागा घेण्याचे धाडस त्यांच्यात नाही, असे ते म्हणाले. तसेच, केंद्रीय गृहमंत्रीही सभागृहात का अनुपस्थित आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही