मुंबई : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) द्वारे दिल्लीत करण्यात आलेले आंदोलन आता संपले आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) हे त्यांच्या छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) या मूळ गावी पोहोचले आहेत, जिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर आगमन होताच त्यांचा सत्कार करण्यात आला आणि समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित दीपके यांनी मोदी सरकारला (Modi Government) कडक इशारा दिला. त्यांच्या विधानावरून असे संकेत मिळतात की, CJP भविष्यात आणखी मोठे आंदोलन उभारण्याची शक्यता आहे.
“सुमारे ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर घरी परतताना मला खूप आनंद होत आहे. भारतात आल्यापासूनच हे आंदोलन (Student Protest) सुरू होते. आम्ही गेल्या ३६ दिवसांपासून जंतर-मंतरवर तळ ठोकून होतो. आमच्या कष्टाचे फळ मिळाले आहे आणि हा देशभरातील विद्यार्थ्यांचा विजय आहे. माझ्या पालकांना पुन्हा भेटताना मला आनंद होत आहे,” अशा भावना अभिजीत दीपके यांनी व्यक्त केल्या.
हेच विद्यार्थी भविष्यात सरकार बदलतील
अभिजित दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका करत त्यांना आपली कार्यपद्धती सुधारण्याचे आवाहन केले. २० जुलै रोजी सरकारच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर रक्त सांडावे लागले, रक्तपात होऊनही सरकारवर काहीच परिणाम झाला नाही आणि विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावणे आणि अटक किंवा स्थानबद्धतेची भीती दाखवणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप दिपके यांनी केला.
“विद्यार्थी हे काही दहशतवादी नाहीत, ते देशाचे भविष्य आहेत. जर देशाच्या भविष्याला अशा प्रकारे त्रास दिला गेला, तर सरकारला भविष्यात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. आज केवळ धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. जर या सरकारने जबाबदारीने वागले नाही, तर हेच विद्यार्थी भविष्यात सरकार बदलतील,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. दरम्यान, भविष्यात ते काय पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Coal Scam प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; मनमोहन सिंग यांना अखेर मोठा दिलासा
- राहुल गांधींच्या ‘अंधभक्त’ विधानाने संसदेत खळबळ; राजनाथ सिंहांचा तीव्र आक्षेप
- ‘तिला कोण गंभीरपणे घेतं?’ ‘GenZ गटार’ वक्तव्यावर अभिजित दिपकेचा पलटवार













