Share

अभिजीत दिपके पुन्हा आक्रमक; 5 सप्टेंबरला दिल्लीत मोठा मोर्चा

अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी 5 सप्टेंबरला दिल्लीत मोर्चाची घोषणा करत सरकारला इशारा दिला.

Published On: 

Abhijit Dipke on Delhi protest

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) अलीकडच्या काळात चर्चेत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर (Protest)  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनादरम्यान दिपके यांच्यासोबत आशुतोष रांका आणि सौरभ दास हे देखील प्रमुख चेहरे म्हणून समोर आले.

तुम्ही दिल्लीत धिंगाणा घालण्यासाठी येतात का? असे विचारले असता दिपके म्हणाले की, आम्हाला थोडी हे आवडते. पण करावे लागते. आम्ही वारंवार सांगत आहोत की, ज्या विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले, त्या कुटुंबियांना मदत पोहोचवा. १ कोटी बद्दल आम्ही बोललो होतो. १ कोटी काही सरकारसाठी मोठी रक्कम नक्कीच नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Abhijit Dipke on Delhi protest

अभिजीत दिपके यांनी सांगितले की, “५० ते १०० कोटी तुम्ही खासदारांना खरेदीसाठी लावता. ५ सप्टेंबरला आम्ही इंडिया गेट ते पोलीस मुख्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहोत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि पीडित कुटुंबियांना मदत व्हावी, आशुतोष रांका यांना हिंसाबद्दल विचारले असता दिपके म्हणाले की, “आम्ही मार खाऊन येणारे लोक आहोत, मला मारहाण झाली. रांकाला मारहाण झाली.”

पुढे दिपके यांनी सांगितले की, “आता फक्त वाचला आहे तो म्हणजे साैरव, त्याचाही नंबर येईल. दिपके यांनी पुन्हा एकदा सरकारचे टेन्शन वाढवले आहे. ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत आणखी एक मोर्चा काढणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सरकार आधीच सतर्क झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच दिपके यांनी आपली मोहीम जिल्हा परिषद शाळांकडे वळवली होती आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक शाळांची पाहणी केली होती. छत्रपती संभाजीनगर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची बैठक झाली, ज्याला पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, ते सध्या तरी निवडणूक राजकारणात उतरणार नाहीत, तर त्याऐवजी विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांसाठी लढा देण्यावर लक्ष केंद्रित करतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही