Share

संजू सॅमसन इन, अभिषेक शर्मा आऊट? अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी चर्चेत आहे. संजू सॅमसनचं पुनरागमन आणि श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद येण्याची दाट शक्यता आहे.

Published On: 

India vs Afghanistan T20 Series 2026: Sanju Samson in blue jersey - Potential Team India squad for Afghanistan T20I series

India vs Afghanistan T20 Series 2026: टी-20 वर्ल्ड कप गाजवणारा आपला संजू सॅमसन पुन्हा टीम इंडियात परतणार का? हा प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. सप्टेंबरमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज रंगणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यासाठी आपली १५ जणांची टीम जाहीरही केली. पण बीसीसीआयच्या घोषणेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेत टीम इंडियाची कमान श्रेयस अय्यरकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

संजू सॅमसनला संधी, तर अभिषेक शर्माचा पत्ता कट?

अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्ध भारताने चांगली कामगिरी केली होती. पण त्याआधी इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाला एकही मॅच जिंकता आली नव्हती. त्यामुळे दिल्लीत १३, १५ आणि १७ सप्टेंबरला होणाऱ्या या सीरिजसाठी बीसीसीआय एक मजबूत टीम मैदानात उतरवणार हे नक्की. खराब फॉर्ममुळे अभिषेक शर्माला डच्चू मिळू शकतो. त्याच्या जागी, २०२६ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनची एन्ट्री होऊ शकते.

दुसरीकडे, गोलंदाजीत भारताचा हुकमी एक्का अर्शदीप सिंगचं पुनरागमन निश्चित मानलं जातंय. पण सर्वात मोठी चर्चा आहे ती भुवनेश्वर कुमारची. आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीकडून आणि सध्या यूपी टी-20 लीगमध्ये भुवीने आपल्या गोलंदाजीचा कहर केलाय. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळते का, हे पाहणं रंजक ठरेल. याशिवाय, फेब्रुवारीपासून टी-20 न खेळलेला कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मयंक यादव यांच्या नावावरही जोरदार विचार सुरू आहे.

जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांच्यासह काही प्रमुख खेळाडू सध्या दुखापतीने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून असेल. याच पार्श्वभूमीवर ईशान किशन, शिवम दुबे, रवी बिश्नोई आणि तिलक वर्मा यांना टीममध्ये कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

India’s likely squad for T20I series against Afghanistan

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, सूर्यांश शेडगे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही