Share

IND vs AFG Test: न्यू चंदीगडमध्ये रंगणार महामुकाबला, पण पावसाच्या सावटात कोणाचं पारडं जड?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आजपासून कसोटी सामना रंगणार आहे. न्यू चंदीगडमधील खेळपट्टी आणि पहिल्या दिवशी असणाऱ्या पावसाच्या सावटाने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

Published On: 

IND vs AFG Test pitch preparation under cloudy skies in New Chandigarh.

🕒 1 min read

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात तब्बल २६२ धावांनी पराभूत झाल्याची सल अफगाणिस्तानचा संघ विसरला असेल का? तब्बल ८ वर्षांनंतर, म्हणजेच २०१८ च्या त्या ऐतिहासिक सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानचे (IND vs AFG Test) संघ पुन्हा एकदा कसोटीच्या मैदानात आमनेसामने येत आहेत.

६ जूनपासून न्यू चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर हा सामना सुरू होतोय. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नसला, तरी दोन्ही संघांसाठी आपली ताकद दाखवण्याची ही मोठी संधी आहे. पण या उत्सुकतेवर पहिल्याच दिवशी पाऊस पाणी फेरणार का, अशी भीती चाहत्यांना सतावते आहे.

IND vs AFG Test

मुल्लानपूर येथील या नव्या स्टेडियमची खेळपट्टी काळ्या मातीची बनवण्यात आली आहे. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी मिळण्याची शक्यता अधिकृत सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळेच नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्या डावात गोलंदाजीचा निर्णय घेऊन समोरच्या संघाला अडचणीत आणू शकतो. दोन ते तीन दिवसांचा खेळ झाल्यानंतर मात्र ही खेळपट्टी संथ होईल आणि इथून पुढे फिरकीपटूंची जादू पाहायला मिळू शकते.

दुसरीकडे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी चंदीगडमध्ये सकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर मात्र हवामानात सुधारणा होईल आणि खेळ सुरळीत सुरू होऊ शकतो, अशी आशा आहे.

टीम इंडियाचं नेतृत्व शुबमन गिलकडे असून संघात यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि ऋषभ पंत सारखे अनुभवी खेळाडू आहेत. तर अफगाणिस्तानची धुरा हशमतुल्ला शाहिदी सांभाळत आहे. दोन्ही संघांचे तगडे शिलेदार मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही