Share

Breaking News: विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात; ‘नगरचे जंतर मंतर’वर होणार ‘मौन आंदोलन’

NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरातील ‘नगरचे जंतरमंतर’ येथे मौन धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

Published On: 

Anna Hazare

अहिल्यानगर : गेल्या एक महिन्यापासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ NEET पेपरफुटीच्या प्रकरणामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे आणि यासंदर्भात दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनही सुरू आहे. सोमवारी आपल्या मागण्यांसाठी या पक्षाने संसदेवर मोर्चा काढला, ज्यामुळे आंदोलन करणारे विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने देशभरातील वातावरण अधिकच तापले. अशा परिस्थितीत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, स्वतः यात सक्रिय सहभाग घेत एक मोठी घोषणा केली आहे. (Anna Hazare Support NEET Protest)

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचे मार्ग अवलंबले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी, प्रतिष्ठित समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत ‘मौन धरणे आंदोलना’चे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत गांधी स्मारक, वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे होणार आहे.

“नगरचे जंतर मंतर” प्रतिकात्मक नाव

या निदर्शनाच्या ठिकाणाला ‘नगरचे जंतरमंतर’ असे प्रतिकात्मक नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे मूक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची गरज अधोरेखित करणे, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशीलता दर्शवणे आणि संवादातून मार्ग काढणे हा यामागचा उद्देश आहे.

“दडपशाही नव्हे, संवाद हवा”

या आंदोलनाचा उद्देश एक शांततापूर्ण संदेश देणे आहे. “दडपशाही नको, संवाद हवा” “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” आणि “लोकशाही आणि संविधानाचे रक्षण झालेच पाहिजे.” असा शांततामय संदेश देण्यात येणार आहे.

आयोजकांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांना या मौन धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही