Share

राहुल गांधींनी केंद्र सरकारसमोर मांडल्या 3 मागण्या; “मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी”

NEET पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या केल्या.

Published On: 

Rahul Gandhi

दिल्ली : “विद्यार्थ्यांना काय हवे आहे? त्यांची मागणी फार मोठी नाही. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, १५२ परीक्षांचे पेपर फुटले आहेत. पहिली मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संबंधित आहे. त्यांना पदावरून हटवावे. ही काही मोठी मागणी नाही.” अशी मागणी करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. (Rahul Gandhi NEET Protest)

दोन ठिकाणी झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यानंतर, राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी देशातील उच्च शिक्षणाच्या दयनीय स्थितीचे वर्णन केले आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या आर्थिक ओझ्याबद्दलही भाष्य केले.

तीन मागण्या कोणत्या?

  • धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यांनी पायउतार झाले पाहिजे ही पहिली मागणी आहे.
  • ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांना जबाबदार धरले पाहिजे, ही दुसरी मागणी राहुल गांधींनी केली.
  • तसेच, मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी ही तिसरी मागणी गांधी यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले केले. हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना जबाबदार धरले पाहिजे. हे विद्यार्थी दहशतवादी नाहीत. ते आपले भविष्य आहेत. ते आपले शत्रू नाहीत. ते आपलेच आहेत. त्यांच्यावर हिंसाचार झाला आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला १०० टक्के पाठिंबा देतो. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आम्ही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवू,”

‘शिक्षण पद्धतीत बदल झाले पाहिजेत’

“याचे दोन पैलू आहेत. एका बाजूला विद्यार्थी आणि त्यांचे भविष्य आहे. त्यांचे विषय, शिक्षण पद्धती आणि पेपर फुटीचा मुद्दा. विद्यार्थ्यांना वाटते की संपूर्ण देशाने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी कारवाई झाली पाहिजे, असे मत विरोधी पक्ष आणि मी स्वतः मांडतो. विद्यार्थ्यांच्या या तीन मागण्यांमागील हाच संदर्भ आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. “दुसरे म्हणजे, दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक अशी शक्ती आहे जी आंदोलनावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेचे लक्ष भरकटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही