Share

‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’; शिक्षणमंत्री बदलावर भाजप नेत्याच्या मुलीची टीका

यशस्विनी राजे सिंह यांनी जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षणमंत्री बदलाच्या निर्णयावर ‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’ असा आरोप केला.

Published On: 

Yashaswini Raje Singh Supports CJP

पुणे: नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी'(CJP)ने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. भाजप (BJP) आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या आंदोलनाला ‘राष्ट्रविरोधी’ ठरवले होते आणि विद्यार्थ्यांवर टीकेचा भडिमार केला होता.

मात्र, जेव्हा त्याच पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांनी या विद्यार्थ्यांना उघडपणे पाठिंबा (Support) दिला, तेव्हा सरकारची कोंडी झाली. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेशमधील भाजपच्या एका माजी आमदाराची कन्या आणि लोकप्रिय ‘कंटेंट क्रिएटर’ यशस्वीनी राजे सिंग हिचा समावेश आहे.

Yashaswini Raje Singh Supports CJP

विद्यार्थ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी यशस्वीनीने स्वतः जंतरमंतरला भेट दिली. आंदोलनावरून तणाव वाढत असतानाच, तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना यशस्वीनी म्हणाली, “हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा आहे.”

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर टीका करताना यशस्वीनीने नमूद केले की, त्यांच्या पत्रात त्या घोटाळ्याबद्दल किंवा जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांबद्दल कोणताही पश्चात्ताप दिसून आला नाही. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची मुलेच जेव्हा सरकारी धोरणांवर प्रश्न उपस्थित करू लागली, तेव्हा या आंदोलनाला मोठी गती मिळाली.

नीट (NEET) परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे ‘जनरेशन झेड’ (Gen Z) मधील तरुणांनी २० जूनपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन तब्बल ३६ दिवस चालले. २० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि पेलेट गन्सचा वापर केल्याच्या गंभीर आरोपांनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. अखेरीस, वाढत्या दबावापुढे झुकून सरकारने २५ जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही