Share

नीट पेपरफुटी आंदोलन: जंतर मंतरवरील आंदोलकांवरील गुन्हे मागे; पण ‘या’ विद्यार्थ्यांची सुटका नाही!

जंतर मंतरवर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.

Published On: 

CJP protesters at Jantar Mantar against NEET paper leak | NEET Protest

दिल्ली: जंतर मंतरवर सलग ३६ दिवस चाललेल्या ‘नीट’ पेपरफुटी आंदोलनाला (NEET Protest) यश आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावणाऱ्या या आंदोलकांवर आता पोलिसांची कारवाई होणार की त्यांना दिलासा मिळणार, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.

नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) उभारलेल्या आंदोलनाची दखल घेत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी आणि आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

NEET Protest: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सुट्टी नाही!

संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्च्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली होती. या गदारोळात पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करत जवळपास १३ एफआयआर दाखल करण्यात आले होते. मात्र, आता सरकारने नरमाईची भूमिका घेत सर्वसामान्य आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. पण ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि जे केवळ उपद्रव माजवण्यासाठी यात घुसले होते, अशा लोकांना मात्र कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने ठणकावून सांगितले आहे.

दुसरीकडे, आमच्या कोणत्याही निष्पाप आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल ठेवल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा सीजेपीने सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकार आणि पोलीस प्रशासनाने पावले उचलत आंदोलकांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याच्या आश्वासनानंतर जंतर मंतरवरील हे ऐतिहासिक आंदोलन नुकतेच मागे घेण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही