मुंबई: सीजेपीच्या आंदोलनातील तरुणांना थेट ‘गटरछाप’ म्हणणाऱ्या खासदार कंगना राणौतला आता जोरदार प्रत्युत्तर मिळालं आहे. दिल्लीतील बहुचर्चित आंदोलनावरून राजकारण चांगलंच तापलं असून आता या वादात गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री झाली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी कंगनावर अत्यंत कडक शब्दांत निशाणा साधला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणाईचा तिने जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. या बेताल वक्तव्याबद्दल तिने तत्काळ माफी मागावी, अशी थेट मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
Kangana Ranaut मोहन भागवतांपेक्षा मोठी नाही!
कंगनाने नुकतीच ‘सीजेपी’ अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सडकून टीका केली होती. हे आंदोलन इतके व्यापक होते की त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. याच आंदोलक तरुणांना कंगनाने लक्ष्य केले होते. त्यावर बोलताना सदावर्ते यांनी तिला खडे बोल सुनावले.
तरुणांनी कंगनाच्या सिनेमातील एकाही फोटोवर कधी आक्षेप घेतला नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी तरुणांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतात. त्यामुळे कंगना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापेक्षा मोठी नक्कीच नाही, असा घणाघात सदावर्ते यांनी केला.
दुसरीकडे त्यांनी सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनाही सुनावले. दीपके यांचे बोलणे समजण्यापलीकडे असून त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला.
तसेच, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावरही त्यांनी टीका केली. सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना वेठीस धरू नये. एकनाथ शिंदे आणि जरांगे यांच्यात चांगला संवाद असल्याने शिंदे यांनीच त्यांना समज द्यावी, अशी अपेक्षा सदावर्ते यांनी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- नेपाळमध्ये कावड यात्रेवर भीषण हल्ला; ६ शहरांत संचारबंदी, लष्कर रस्त्यावर, नेमकं काय घडलं?
- महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं थैमान? IMD चा नवा अलर्ट, 10 जिल्ह्यांत हाय अलर्ट!
- पश्चिम आशियातील संकटामुळे भारत हाय अलर्टवर; PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












