Maharashtra rain : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचं चक्र पुन्हा फिरलं आहे का? भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra rain : विदर्भ, कोकण आणि जळगावला रेड अलर्ट
IMD च्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात आजसाठी थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवरही 31 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई आणि ठाण्यात आज यलो अलर्ट देण्यात आला असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे, 1 ऑगस्टपासून विदर्भातील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. पुणे घाटातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असला तरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पश्चिम आशियातील संकटामुळे भारत हाय अलर्टवर; PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
- उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? धनुष्यबाण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्पा
- नाशिकच्या दिलीप गावितने रचला इतिहास; CM फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचा अभिमान













