Share

छत्री-रेनकोट तयार ठेवा! मुंबईसह ठाणे, पालघरला पावसाचा मोठा तडाखा; IMD कडून धोक्याचा इशारा

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. आज अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज आहे.

Published On: 

Mumbai Rain Alert - Heavy rainfall and strong winds expected in Mumbai

IMD Rain Alert: पावसाची सुट्टी आता संपली आहे. राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केलीय. हवामान विभागाने (IMD) आज, म्हणजेच ३१ जुलैसाठी अत्यंत महत्त्वाचा अलर्ट जारी केलाय. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः ठाणे, पालघर आणि रायगडला अतिवृष्टीचा धोका असल्याने थेट ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर, मुंबईला आज ‘यलो अलर्ट’ लागू राहील.

Mumbai Rain Alert: ताशी ७० किमी वेगाने वारे, समुद्रकिनारी जाणे टाळा

पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यानेही टेन्शन वाढवलंय. आज मुंबई आणि उपनगरात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दुसरीकडे, रायगड आणि ठाण्यात हा वाऱ्याचा वेग चक्क ७० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळेच… प्रशासनाने नागरिकांना थेट समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचं स्पष्ट आवाहन केलंय.

पुढचे चार दिवस हवामान कसं असेल?

१ ऑगस्टला पावसाचा जोर थोडा ओसरेल. या दिवशी चारही जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. त्यानंतर २ आणि ३ ऑगस्टला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये मात्र २ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे.

थोडक्यात सांगायचं तर, आजचा दिवस मुंबईकर आणि चाकरमान्यांसाठी कसोटीचा ठरू शकतो. पाणी साचण्याची शक्यता असल्याने, अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडण्याची रिस्क घेऊ नका, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही