मुंबई : मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील गरीब नगर चाळीत (Garib Nagar Chawl) दरड कोसळण्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे रहिवाशांना बाहेर पडायला संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत सात ते आठ झोपड्या दरडीखाली दबल्या गेल्या. (Ghatkopar Landslide after heavy Rain)
घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
सहा जणांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण दहा जण बाधित झाले. त्यापैकी चार जण जखमी झाले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. कुर्ला भाभा रुग्णालयातील डॉ. वर्मा यांनी सांगितले की, जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Ghatkopar landslide rescue after heavy rain
यामध्ये डोक्याला दुखापत झालेला १८ वर्षीय सोहेल अन्सारी याचा समावेश आहे. तसेच इतर जखमींमध्ये १४ वर्षीय मोहम्मद अन्सारी, २८ वर्षीय नईमुद्दीन इक्बाल खान आणि १६ वर्षीय साजिद अन्सारी यांचा समावेश आहे. या चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजावाडी रुग्णालयाच्या सीएमओ (CMO) डॉ. शीतल राऊत यांनी सांगितले की, एकूण सहा जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, या सहा जणांना मृत घोषित करण्यात आले. (6 dead, 4 injured)
मृतांमध्ये १४ वर्षीय मोहम्मद समीर अन्सारी, १९ वर्षीय साहिल हुसेन अब्दुल काझी, एक अनोळखी ४५ वर्षीय व्यक्ती, २ वर्षीय अबान आरिफ शेख, ४ वर्षीय मन्नत आरिफ शेख आणि २७ वर्षीय मर्जिना आरिफ शेख यांचा समावेश आहे.
दरड कोसळल्यानंतर रहिवासी ढिगाऱ्याखाली दाबल्या गेले. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य हाती घेण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण १० जण बाधित झाले, त्यापैकी चार जण जखमी झाले आणि सहा जणांनी प्राण गमावले. ही दुर्घटना मध्यरात्री गरीब नगर चाळीत घडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “३ वाजेपासून चर्चा करा, मी उपस्थित राहीन”; विरोधकांच्या गदारोळावर अमित शाहांचा पलटवार
- ‘गटर जनरेशन’ वक्तव्यामुळे कंगना रणौत अडचणीत; MP-MLA कोर्टात तक्रार, 21 ऑगस्टला सुनावणी
- दूध आणि पनीर भेसळखोरांवर MCOCA लावा; एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












