Share

दूध आणि पनीर भेसळखोरांवर MCOCA लावा; एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

दूध भेसळ प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी भेसळखोरांवर मकोका आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत.

Published On: 

Eknath Shinde orders MCOCA action milk adulterators

मुंबई : नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी दिल्या.

विकसित महाराष्ट्र २०४७’ या उपक्रमांतर्गत २०२६-२७ सालासाठी निश्चित केलेली विभागीय उद्दिष्टे आणि त्या दिशेने झालेली प्रगती यांचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी हे निर्देश दिले.

Eknath Shinde orders MCOCA action milk adulterators

“अन्नातील भेसळ हा काही किरकोळ गुन्हा नाही, तो नागरिक आणि मुलांच्या जीवाला थेट धोका आहे. बनावट पनीर आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. या समाजकंटक भेसळखोरांवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध ‘मोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली जावी,” असे शिंदे म्हणाले.

भेसळखोर कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊ शकणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावे, असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, अशा प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया बळकट करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, म्हणून वरिष्ठ कायदेतज्ज्ञांची मदत घेणाऱ्या एका विशेष कायदेशीर पथकाची त्वरित स्थापना करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कायदा व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही