Share

“३ वाजेपासून चर्चा करा, मी उपस्थित राहीन”; विरोधकांच्या गदारोळावर अमित शाहांचा पलटवार

विद्यार्थी आंदोलनावरील वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी संसदेत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी दर्शवली आहे.

Published On: 

Amit Shah in Parliament amid student protest 

नवी दिल्ली : दिल्लीत आंदोलन (Student Protest) करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि ‘पेलेट गन्स’चा वापर या मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांनी (Opposition) आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन यावर उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधक करत होते.

विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. या गोंधळादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले. विरोधकांना थेट आव्हान देत त्यांनी सांगितले की, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास ते तयार आहेत.

Amit Shah in Parliament amid student protest 

वाढत्या राजकीय वादळ आणि संसदेत विरोधकांनी निर्माण केलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमित शाह यांनी म्हटले की, “सरकारकडे लपवण्यासाठी काहीही नाही. मी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास पूर्णपणे तयार आहे,” असे म्हणत त्यांनी संसदेत चर्चेचे खुले आव्हान (Challenge) दिले आहे.

पुढे अमित शाह म्हणाले की, “सध्या विरोधी पक्षाकडून ‘बेपत्ता’, ‘पळून गेले’ आणि ‘भगोडे’ यांसारख्या शब्दांचा वापर केला जात आहे. पण जर विरोधक संसदेची दोन्ही सभागृहे चालू देत नसतील, तर तिथे जाऊन काय करणार?”, असा उलट सवाल त्यांनी केला.

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतील कोंडी फोडण्यासाठी विशिष्ट वेळेची थेट घोषणा करून विरोधी पक्षाच्या कोर्टात चेंडू टाकला. ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करायला तयार आहे.”

“विरोधकांनी आज दुपारी २ वाजेपर्यंत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र देऊन चर्चेची मागणी करावी. आज दुपारी ३ वाजेपासून चर्चा सुरू करा, मी स्वतः संसदेत पूर्ण वेळ उपस्थित राहीन आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे देईन’’, असे शाह यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही