Share

वीज मंडळ माफियासारखं वागतंय! तनिषा मुखर्जीचा संताप; फडणवीस, अमित शाहांकडे केली हस्तक्षेपाची मागणी

जास्त वीज बिल पाठवून लोणावळ्यातील वडिलोपार्जित घराची वीज कापल्यामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जीने महाराष्ट्र राज्य वीज मंडळावर माफियागिरीचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे.

Published On: 

Tanishaa Mukerji angry on MSEB

प्रतिनिधी, 30 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री आणि काजोलची बहीण तनिषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) हिने महाराष्ट्र राज्य वीज मंडळावर (MSEB) तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवाजवी वीज बिल पाठवून लोणावळ्यातील तिच्या वडिलोपार्जित घराचा वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी तनिषाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना टॅग करत हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या कन्या असलेल्या तनिषाची पुण्यातील लोणावळ्यात एक जुनी वडिलोपार्जित मालमत्ता आहे. ती विशेष प्रसंगी आणि सुट्ट्यांमध्ये अनेकदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिथे जाते. तनिषाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत वीज मंडळाच्या कारभारावर कडक शब्दांत टीका केली. “लोणावळ्यातील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ माफियासारखे वागत आहे. ते अवाजवी बिल पाठवत आहेत आणि वीज कापून लोकांना पैसे भरण्यास भाग पाडत आहेत. हा एक गुन्हा आहे,” असे तनिषाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tanishaa Mukerji angry on MSEB

वीज मंडळाचे कर्मचारी बिलाची अंतिम तारीख येण्यापूर्वीच शनिवारी संध्याकाळी वीज कापायला येतात, त्यामुळे लोकांना ओलीस ठेवल्यासारखे वाटत असल्याचा दावाही तिने केला. आपल्या पोस्टच्या शेवटी तिने मुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह योगी आदित्यनाथ आणि टाटा पॉवर यांना टॅग केले आहे. “कृपया लोणावळ्याला या! इथे कोणतेही नियम आणि कायदे नाहीत, त्यांना जे वाटेल तेच ते करत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया तिने दिली.

तनिषाच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, तिने २००३ मध्ये करण नाथ आणि डिनो मोरिया यांच्यासोबत ‘Sssshhh’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. त्यानंतर ती ‘सरकार’, ‘नील ‘एन’ निक्की’ आणि तमिळ हिट ‘उन्नाले उन्नाले’ मध्ये झळकली. २०१३ मध्ये ‘बिग बॉस ७’ ची ती पहिली उपविजेती ठरली होती. तसेच तिने ‘खतरों के खिलाडी ७’ आणि ‘झलक दिखला जा ११’ मध्येही सहभाग घेतला होता. तनिषा शेवटची २०१४ च्या ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

तनिषा मुखर्जीने आरोप केला आहे की, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ माफियासारखे वागत असून अवाजवी वीज बिल पाठवून तिच्या लोणावळ्यातील वडिलोपार्जित घराचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही