दिल्ली, 19 ऑक्टोबर: राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान खासदार पार्थ पवार हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे अर्थखाते मिळणार का, या चर्चेला आता पुन्हा उधाण आले आहे.
प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शाह यांची घेतलेली ही दुसरी भेट असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली दौऱ्यातील या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि अर्थखात्याचे वाटप या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थखाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची सातत्याने मागणी आहे. पक्षाचे नेते प्रफुल पटेल आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही या मागणीसाठी आग्रह धरला आहे.
यापूर्वी पुण्यातही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची समन्वय बैठक पार पडली होती. या बैठकीत अर्थखात्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. मात्र, महायुतीमध्ये कोणतीही नाराजी किंवा वाद नसल्याचे स्पष्टीकरण भाजप आमदार राहुल कुल यांनी दिले होते.
दुसरीकडे, काल १८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य केले होते. सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार नसल्याचा दावा करत, अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने हे खाते स्वतःकडेच ठेवल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. आता या सर्व घडामोडींनंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी अर्थखात्याचा हा तिढा सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- 90च्या दशकातील रोमँटिक गाणं, आजही ट्रक, बस आणि ऑटो रिक्षामध्ये ऐकू येतं, या गाण्याचे आजही आहेत प्रचंड चाहते
- ‘आमचा रांगडा पाटील जिंकला, आता शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार’; धैर्यशील मोहिते पाटलांचा विश्वास
- सुकन्या समृद्धी योजना: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर खात्यातील संपूर्ण पैसे काढता येतात का? जाणून घ्या नियम
Quick Answers
सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि अर्थखात्याचे वाटप या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थखाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे.
सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला, तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने हे खाते स्वतःकडेच ठेवल्याची टीका केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







