सोलापूर, 19 ऑक्टोबर: कोल्हापूरच्या 'गोकुळ' निवडणुकीतील निकालानंतर आता पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच जिंकेल, असा विश्वास माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरचा आमचा रांगडा पाटील जिंकला असून, आता शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार असल्याचा टोला त्यांनी महायुतीला लगावला.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात बोलताना खासदार मोहिते पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याचा समाचार घेतला. सत्तेचा विचार न करता कोल्हापूरची जनता कायम सत्याच्या बाजूने लढणाऱ्या आणि २४ तास लोकांसाठी उपलब्ध असणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभी राहते, हे गोकुळच्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी आमदार राजीव खरे आणि पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव उपस्थित होत्या.
या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघातून जयंत तासगावकर आणि पदवीधरमधून हर्षदा देशमुख-जाधव नक्की विजयी होतील, असा दावा मोहिते पाटील यांनी केला. यावेळी उमेदवार हर्षदा जाधव यांनीही 'गोकुळ पॅटर्न'ची पुनरावृत्ती या निवडणुकीत दिसेल असे सांगितले. जंतर-मंतर किंवा पुण्यातील आंदोलने पाहता सुशिक्षित तरुणांमध्ये सध्याच्या सरकारविरोधात प्रचंड आक्रोश आहे. तरुणाईचा हा संताप आगामी २३ तारखेला मतदानातून दिसून येईल, असे जाधव पंढरपूरमध्ये म्हणाल्या.
त्याचबरोबर, हर्षदा देशमुख-जाधव यांनी कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीचे सर्व नेते पूर्णपणे सज्ज असून, आम्ही काल उठून आज पळायला सुरुवात केलेली नाही, त्यामुळे या निवडणुकीत आमचाच विजय निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुकन्या समृद्धी योजना: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर खात्यातील संपूर्ण पैसे काढता येतात का? जाणून घ्या नियम
- Dussehra 2026 : दसऱ्याला आपट्याची पानं ‘सोनं’ म्हणून का वाटतात? जाणून घ्या परंपरेमागची रंजक कथा
- बदलणाऱ्या ऋतूत ओठांची काळजी कशी घ्यावी? भेगा आणि कोरडेपणा टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







