मुंबई, 19 ऑक्टोबर: बदलत्या हवामानामुळे हवा कोरडी होऊ लागली की, त्याचा सर्वाधिक फटका आपल्या त्वचेला आणि विशेषतः ओठांना बसतो. कोरड्या हवेमुळे ओठ फाटणे, त्वचा सोलवटणे आणि अनेकदा वेदना होण्यासारख्या समस्या उद्भवतात. या बदलणाऱ्या ऋतूत ओठांवर कोरड्या त्वचेचा थर साचत असेल, तर त्वचाविकार तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे उपाय (Lip Care) सुचवले आहेत.
अनेकदा लोक थेट कोरड्या ओठांवर लिप बाम लावतात, मात्र त्याऐवजी आधी हलक्या आणि सुगंधरहित मॉइश्चरायझरचा पातळ थर लावून मग लिप बाम वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच, ओठ कोरडे पडल्यावर वारंवार त्यावर जीभ फिरवण्याची सवय अनेकांना असते. लाळेमध्ये असलेल्या एन्झाइम्समुळे ओठांच्या नाजूक त्वचेला त्रास होऊ शकतो. लाळ सुकल्यानंतर ओठ आधीपेक्षा जास्त कोरडे पडतात, त्यामुळे ओठांवर जीभ फिरवणे टाळायला हवे.
मॅट लिपस्टिकच्या सततच्या वापरामुळेही ओठ फाटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, काही काळासाठी मॅट लिपस्टिकचा वापर थांबवून त्याऐवजी ग्लॉसी किंवा मॉइश्चरायझिंग लिपस्टिकचा पर्याय निवडावा. याशिवाय, चेहऱ्यावरील मुरुमांसाठी (अँटी-ॲक्ने) वापरण्यात येणारे क्रीम ओठांच्या आसपास लागणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा क्रीममधील घटकांमुळे ओठांची जळजळ होऊन ते कोरडे पडू शकतात.
ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी, दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर भरपूर मॉइश्चरायझर लावून त्यावर पेट्रोलियम जेलीचा थर लावावा. पेट्रोलियम जेलीच्या संरक्षक थरामुळे रात्रभर ओलावा टिकून राहतो आणि सकाळी ओठ मऊ लागतात. मात्र, ओठ सतत फाटत असतील, त्यातून रक्त येत असेल किंवा सूज आणि जळजळ बरेच दिवस कायम असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अलका याग्निक-अनुराधा पौडवाल वादातून झाली गुलशन कुमार यांची हत्या? उज्ज्वल निकमांचा मोठा खुलासा
- जंतरमंतर आंदोलन प्रकरण: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या सौरव दास, आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
- गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांची बाजी, पण निकाल फिरवण्याच्या प्रयत्नांवरून रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








