मुंबई: तुम्हालाही ऐनवेळी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नाही म्हणून तुम्ही एजंटला जास्तीचे पैसे देताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चक्क राज्याच्या राज्यपालांच्या नावाने बनावट लेटरपॅड आणि शिक्के वापरून रेल्वेच्या ‘व्हीआयपी’ कोट्यातून तिकिटं विकणाऱ्या एका महाठगांच्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
मलबार हिल पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत उत्तर प्रदेश, गुजरात आणि मुंबईतून तब्बल ६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने इमर्जन्सी कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी थेट लोकभवन कार्यालयाचे खोटे शिक्के आणि राज्यपालांच्या खोट्या सह्यांचा खुलेआम वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे.
VIP Railway Ticket Scam: अमरीश ठक्कर पोलिसांच्या जाळ्यात
या आंतरराज्यीय टोळीकडून पोलिसांनी १२ मोबाईल, एक लॅपटॉप, १६ सिमकार्ड आणि ७० बँक कार्ड जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, यांच्याकडे तब्बल ४०० हून अधिक प्रवाशांचा गोपनीय डेटा आणि अनेक बनावट ओळखपत्रे सापडली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमरीश ठक्कर असून त्याच्यावर याआधीही मुंबई सेंट्रल आणि कुर्ला रेल्वे पोलिसांत असेच गुन्हे दाखल आहेत. मलबार हिल पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दुसरीकडे, रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे, याचा संतापजनक प्रकार ठाणे स्थानकात उघडकीस आला आहे. फलाट क्रमांक २ वरील कॅन्टीनमध्ये चक्क उंदीर भेळेसाठी कापलेला टोमॅटो खात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दाव्यांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नीट पेपरफुटी आंदोलन: जंतर मंतरवरील आंदोलकांवरील गुन्हे मागे; पण ‘या’ विद्यार्थ्यांची सुटका नाही!
- लाडक्या बहिणींना झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मोठा धक्का
- संजय राऊतांचा राज्यसभेत मोठा गौप्यस्फोट; नीट पेपरफुटीत अडकलेले ते ८ जण भाजपचेच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











