मुंबई, 19 ऑक्टोबर: जुहू येथे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर काल झालेल्या गोळीबार प्रकरणी तीनही आरोपींना राजस्थानमधील कोटा शहरातून अटक करण्यात आली आहे. त्यांना आता मुंबईत आणले जात आहे. पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. या घटनेतील कोणीही आरोपी अल्पवयीन नसून सर्व सज्ञान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी दोघांनी टायगर श्रॉफ यांच्या कारवर ५ ते ६ राऊंड फायरिंग केले आणि ते पळून गेले. आरोपींनी पळ काढण्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावर सापडली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मागोवा घेतला असता, आरोपी पुणे-जयपूर एक्सप्रेसने पुढे गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी माहिती काढून ते कोणत्या बोगीत आहेत, हे जयपूर पोलिसांना कळवले. मुंबई पोलिसांच्या टीमने त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेतले.
या गुन्ह्यात दोन शस्त्रांचा वापर करण्यात आला असून हे खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचे प्रकरण असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. या कारवाईत दिल्ली, राजस्थान आणि गुजरात पोलिसांची मदत मिळाली आहे. सध्या आरोपींकडे प्राथमिक चौकशी सुरू असून न्यायालयाची प्रक्रियाही सुरू आहे. तपासात ज्यांची नावे पुढे येतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, आरोपींकडे ही दुचाकी कुठून व कशी आली, याचाही शोध घेतला जात आहे.
बिश्नोई गँगबाबत सध्या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप आणि पोस्टची पडताळणी होणे बाकी असून, त्यानंतरच अधिक माहिती देता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच मागील प्रकरणांमध्ये मोक्का (MCOCA) लावण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. कायदेशीर आणि एसओपीची (SOP) प्रक्रिया पाळली जात आहे. यातील दोन आरोपी बिहारमधील सोनीपतचे असून एक जण बिहारचा आहे. त्यांच्यापैकी एकाचे शिक्षण बारावी तर एकाचे आठवीपर्यंत झाले आहे. दोन आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते, तर तिसरा त्यांच्या संपर्कात कसा आला याचा तपास सुरू आहे. टायगर श्रॉफ यांची यापूर्वी कोणतीही तक्रार नव्हती, तसेच सेलिब्रिटींना एसओपीनुसार सुरक्षा पुरवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट: फेरमतमोजणीत आकडे फिरले, सतेज पाटलांना धक्का मात्र सत्ता निश्चित
- रणजी करंडक: सरफराज खान आणि रजत पाटीदारचा धमाका, झळकावली शानदार शतके
- राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी
Quick Answers
या प्रकरणातील तिन्ही आरोपींना राजस्थानमधील कोटा शहरातून अटक करण्यात आली आहे आणि त्यांना आता मुंबईत आणले जात आहे.
दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी दोघांनी टायगर श्रॉफ यांच्या कारवर ५ ते ६ राऊंड फायरिंग केले आणि त्यानंतर ते पळून गेले.
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात दोन शस्त्रांचा वापर करण्यात आला असून हे खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचे प्रकरण आहे.
बिश्नोई गँगबाबत व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप आणि पोस्टची पडताळणी होणे बाकी असून, त्यानंतरच अधिक माहिती देता येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






