करार संपूनही घर रिकामे न करणाऱ्या भाडेकरूला दणका; दुप्पट दंड वसुलीचा पहिला ऐतिहासिक निकाल

लीव्ह अँड लायसन्स करार संपल्यावरही फ्लॅट रिकामी न करणाऱ्या भाडेकरूला तात्काळ ताबा देण्याचे आणि दुप्पट भाडे भरण्याचे आदेश प्राधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Published On: 

Tenant eviction legal action by Mumbai police authorities

मुंबई, 13 नोव्हेंबर: मुंबईत लीव्ह अँड लायसन्स कराराची मुदत संपल्यानंतरही घर रिकामे न करणाऱ्या भाडेकरूला मोठा कायदेशीर दणका बसला आहे. महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला हा पहिलाच महत्त्वपूर्ण निकाल असून, यामुळे मालकाचा ताबा बळकावून बसणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.

सांताक्रूझ पूर्व भागातील एका फ्लॅटचा ३६ महिन्यांचा लीव्ह अँड लायसन्स करार संपुष्टात आला होता. मात्र, त्यानंतरही भाडेकरूने घरमालकाला फ्लॅटचा ताबा देण्यास स्पष्ट नकार दिला. या त्रासाला कंटाळून मालकाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे रीतसर अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘पोलीस उपायुक्त तथा सक्षम प्राधिकारी, पश्चिम विभाग-१’ यांनी महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियमाच्या कलम २४ आणि ४३ नुसार सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान भाडेकरूचा युक्तिवाद फेटाळून लावत प्राधिकाऱ्यांनी मालकाचा निष्कासन अर्ज मंजूर केला. तसेच घराचा रिकामा व शांततापूर्ण ताबा आणि सर्व चाव्या तात्काळ मालकाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले.

याशिवाय, १ सप्टेंबर २०२६ पासून घराचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत भाडेकरूने करारातील मासिक शुल्काच्या दुप्पट दराने नुकसानभरपाई द्यावी, असा दणकाही देण्यात आला आहे. भाडेकरूची कोणतीही अनामत रक्कम मालकाकडे अडकली असल्यास, ती परत मिळवण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर मार्गाने दावा करण्याची मुभा त्याला देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या ३१ जुलै २०२६ च्या अधिसूचनेनुसार, घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादावरील कायदेशीर प्रक्रिया जलद व्हावी यासाठी मुंबईतील १५ परिमंडळीय पोलीस उपायुक्तांची ‘सक्षम प्राधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या यंत्रणेअंतर्गत झालेली ही पहिलीच धडक कारवाई आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता कराराची मुदत संपूनही जागा न सोडणाऱ्यांवर थेट संबंधित परिमंडळाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अर्ज करून कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही