मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर

मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आला आहे. यामध्ये महापौर कार्यालयासह ५ महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.

Published On: 

Security checking outside BMC mayor office and important locations in Mumbai after bomb threat email

मुंबई, 12 नोव्हेंबर: मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी १०.१२ मिनिटांनी प्राप्त झालेल्या या ईमेलमध्ये मुंबईच्या महापौर कार्यालयासह ५ ठिकाणांना लक्ष्य केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गंभीर प्रकारानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आल्या आहेत.

या धमकीच्या ईमेलमध्ये महापौर कार्यालयासोबतच मुंबईतील बँका, न्यायालये, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा धमकीचा ईमेल येण्याची ही सलग तिसरी वेळ असून, दोन आठवड्यांपूर्वीही असाच एक ईमेल आला होता.

धमकीच्या या ईमेलमध्ये ‘खलिस्तान बोलेगा मुंबई जिंदाबाद’ असा धक्कादायक मजकूर लिहिण्यात आला आहे. महापालिकेचा उल्लेख असल्याने येथील सुरक्षा व्यवस्था तात्काळ कडेकोट करण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. सुदैवाने या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यालयातील दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र, महापालिका कार्यालय परिसरासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी पथके बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आता हा धमकीचा ईमेल नेमका कुठून आला, याचा तांत्रिक तपास करणे आणि आरोपींना गजाआड करणे हे मुंबई पोलीस व तपास यंत्रणांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही