आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप

पेंच अभयारण्य परिसरातील अपघातात एका तरुणाचा मृत्यू. भाजप आमदार परिणय फुके यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप.

Published On: 

Alleged accident involving MLA Parinay Fuke son in Pench

प्रतिनिधी, 12 नोव्हेंबर: मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर नागपूरजवळील पेंच अभयारण्य परिसरात एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त गाडी भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची असून अपघाताच्या वेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

या घटनेवरून सपकाळ यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. एका निष्पाप तरुणाचा बळी गेला असून, राजकीय दबावापोटी किंवा सत्तेचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आमदाराचा मुलगा असल्याने त्याला कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सपकाळ यांनी ट्विटद्वारे केली आहे.

दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या अपघाताबाबत खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरधाव कारने चेक पोस्ट उडवून दिले आणि त्यानंतर ती उलटली. या गाडीत आमदार फुके यांच्या मुलासह पाच ते सहा तरुण-तरुणी होते, असेही त्यांनी म्हटले आहे. सत्तेची ताकद वापरून हे अपघात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंधारे यांनी केल्यामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही