Share

लाडक्या बहिणींना झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मोठा धक्का

दिल्लीत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने ‘दिल्ली लक्ष्मी’ योजनेला मंजुरी दिली असून, तीनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या महिलांना या लाभातून वगळण्यात आले आहे.

Published On: 

Delhi Lakshmi Yojana scheme rules announced by BJP government for women

दिल्ली– महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता दिल्लीतही महिलांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर झाली आहे. पण या नव्या योजनेतील एका कडक अटीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिल्लीत सत्ता स्थापन करताच भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं सर्वात मोठं आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत ‘दिल्ली लक्ष्मी’ योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. या अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जातील.

Lakshmi Yojana: ३ पेक्षा जास्त मुले असलेल्यांना मोठा धक्का

दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयाने या योजनेची सविस्तर नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, ज्या महिलांचे वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

पण या योजनेतील सर्वात मोठी आणि चर्चेत असलेली अट म्हणजे अपत्यांची संख्या. ज्या महिलांना तीन किंवा त्यापेक्षा कमी अपत्ये आहेत, त्याच या योजनेसाठी पात्र ठरतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनपेक्षा अधिक मुलं असणाऱ्या महिलांना या योजनेच्या लाभातून पूर्णपणे वगळण्यात येणार आहे.

त्यामुळे निकष न बसणाऱ्या महिलांना सरकारकडून एकही रुपया मिळणार नाही. दुसरीकडे, या पैशांच्या वाटपाबाबतही एक नवा प्रयोग होण्याची शक्यता आहे. हे पैसे बँक खात्यात जमा करण्याऐवजी महिलांना थेट कॅश स्वरूपात देण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत केवायसी सक्तीमुळे अनेक लाभार्थी वगळले गेले. त्यामुळेच आता दिल्ली सरकारच्या या तीन अपत्यांच्या अटीमुळे नेमक्या किती महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही