Share

अभिजीत दिपके अडचणीत? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची दिल्ली पोलिसांकडे अटकेची मागणी

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत अभिजीत दिपकेच्या अटकेची मागणी केली आहे.

Published On: 

Faizan Ansari files complaint against Abhijit Dipke

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी (Faizan Ansari) याने ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल (Complaint) केली आहे. दिपके यांच्या समर्थकांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अन्सारीने केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि अभिजीत दिपके यांना अटक करावी, अशी मागणी त्याने केली आहे.

अन्सारीने सांगितले की, त्याने दिपके यांच्या विरोधात दिल्लीच्या डीसीपींकडे (DCP) लेखी तक्रार सादर केली आहे. “अभिजीत दिपके यांच्या समर्थकांनी माझ्यावर हल्ला केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत,” असा दावा अन्सारीने केला.

Faizan Ansari files complaint against Abhijit Dipke

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप फैजान अन्सारीने केला. या दोन घटनांबाबत आधीच गुन्हे दाखल झाले असले, तरी आता त्याने दिल्ली पोलिसांकडेही कारवाईची मागणी केली आहे. दिपके वैयक्तिक फायद्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया करतात, असा आरोप करत अन्सारीने दिल्ली पोलिसांना अभिजीत दिपके यांना तात्काळ अटक करण्याचे आवाहन केले.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे कौतुक

फैजान अन्सारीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांचेही कौतुक केले. तो म्हणाला, “सोनम वांगचुक यांना योग्यवेळी ताब्यात घेऊन दिल्लीतील वातावरण बिघडण्यापासून रोखल्याबद्दल मी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांना सलाम करतो.” अभिजीत दिपके स्वार्थापोटी वागतात, हा आपला दावा त्याने पुन्हा एकदा अधोरेखित केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही