एका तरुण पोराने थेट केंद्राला घाम फोडला आणि इकडे भल्याभल्या नेत्यांना मात्र खुर्चीचा मोह सुटत नाहीये. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अगदी याच शब्दांत आपल्याच पक्षातील नेत्यांचे कान टोचले आहेत.
सीजेपी (CJP) म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) सध्या देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. जंतरमंतरवरील त्यांचं आंदोलन आणि सरकारला थेट भिडण्याची त्यांची स्टाईल याची चर्चा आता खुद्द महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली आहे. ठाण्यातील एका बैठकीत ठाकरेंनी दीपके यांचं कौतुक करत पक्षातील नेत्यांना मात्र खडे बोल सुनावले आहेत.
Uddhav Thackeray Abhijeet Dipke
कल्याण लोकसभा मतदारसंघातील जुने आणि नवे कार्यकर्ते यांच्यात सध्या पदांवरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या ठाणे-कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत या गटबाजीचे पडसाद उमटले. आमदार मिलिंद नार्वेकर, केदार दिघे आणि विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत सुरू असलेली ही शाब्दिक चकमक पाहून ठाकरे चांगलेच संतापले.
“देशातील परिस्थिती पाहा. अभिजीत दीपकेसारखा एक तरुण कार्यकर्ता आंदोलनाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतोय. आणि तुम्ही मात्र छोट्या पदांसाठी एकमेकांशी काय भांडताय?” अशा कडक शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. थोडक्यात सांगायचं तर, कार्यकर्त्यांनी अंतर्गत गटबाजी सोडून व्यापक राजकीय लढ्याकडे लक्ष द्यावं, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि अभिजीत दीपके यांच्यात नुकताच फोनवरून संवाद झाला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून हा संपर्क झाल्याची चर्चा आहे. या संभाषणात ठाकरेंनी दीपके यांच्या आंदोलनाचं कौतुक करत त्यांना मुंबईतील ‘मातोश्री’वर भेटीसाठी निमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सलमानच्या एका वक्तव्यावर एकता कपूर भडकली? थेट म्हणाली ‘वेडा एक्स……’
- धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे भवितव्य पणाला
- काँग्रेसने सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हणताच अंजली दमानिया खवळल्या, दिलं सडेतोड उत्तर!
- महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; सनी लिओनीला पाहताच क्षणी चित्रपट का दिला?













