Share

सलमानच्या एका वक्तव्यावर एकता कपूर भडकली? थेट म्हणाली ‘वेडा एक्स……’

रितेश देशमुखची नोकरी धोक्यात असल्याचं सलमान खान म्हणाला होता. त्यावर एकता कपूरने ‘क्रेझी एक्स’ म्हणत इन्स्टाग्रामवरून थेट निशाणा साधला आहे.

Published On: 

Salman Khan and Ekta Kapoor controversy over reality show

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण यावेळी त्याने असं काय म्हटलंय, ज्यामुळे टीव्ही क्वीन एकता कपूरचा (Ekta Kapoor) पारा इतका चढला?

सलमान खान नुकताच त्याचा भाऊ सोहेल खानला सपोर्ट करण्यासाठी ‘अलायंस’ या शोच्या प्रमोशनमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने गमतीत एक विधान केलं आणि सोशल मीडियावर वादाची ठिणगी पडली. “मला वाटतंय की आता रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे,” असं सलमान म्हणाला होता. त्याचा हाच व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

Salman Khan Ekta Kapoor

सलमानच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की, तो ‘लॉकअप’ या शोमध्ये रितेश किंवा फराह खानला रिप्लेस करणार का? यावर रितेश आणि फराह यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण, ‘लॉकअप’ची निर्माती एकता कपूरने थेट इन्स्टाग्रामवर एक सूचक पोस्ट शेअर केली.

एकताने तिच्या स्टोरीवर लिहिलं, “जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी एखाद्या वेड्या एक्स (Ex) प्रमाणे प्रत्येक एपिसोडमध्ये तुमचाच उल्लेख करतो…” या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. एकताचा हा थेट निशाणा सलमानवरच असल्याची दाट चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

खरं तर सलमान आणि एकताची खूप जुनी आणि चांगली मैत्री आहे. ती बिग बॉसमध्येही अनेकदा आली आहे. शिवाय अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉटही केलं जातं. पण आता एकताच्या या ‘क्रेझी एक्स’ वाल्या पोस्टमुळे या दोन दिग्गजांमध्ये खरोखरच जुंपली आहे की हा फक्त शोच्या प्रमोशनचा भाग आहे, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही