अभिजीत दिपकेंच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ; ‘५०-१०० रुपयांसाठी आलेले लोक’, दिपकेंचा संताप

कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत जोरदार घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घालण्यात आला. यावर अभिजीत दिपके यांनी ५०, १०० रुपयांसाठी आलेले लोक म्हणत टीका केली.

Published On: 

CJP founder Abhijit Dipke challenges the PM Modi

दिल्ली, 15 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. उपस्थित काहींनी ‘पत्रकार परिषद बंद करा, बंद करा’ अशी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या परिषदेला नेहा बोरा आणि अभिजीत दिपके उपस्थित होते. या गोंधळावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘५०, १०० रुपयांसाठी गोंधळ घालणारे हे लोक आहेत,’ अशी सडकून टीका दिपके यांनी यावेळी केली.

सीजेपीचे सदस्य असलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईच्या विरोधात शुक्रवारी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात येणार आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या आंदोलनासाठी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेस परिसरात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी बुधवारीच केले होते. मात्र, प्रत्यक्ष आंदोलनाआधीच आजच्या पत्रकार परिषदेत जोरदार घोषणाबाजी झाल्याने या प्रकरणातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पत्रकार परिषदेत उपस्थित काहींनी 'पत्रकार परिषद बंद करा, बंद करा' अशी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे तिथे तणावाचे वातावरण आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही