August Bank Holidays 2026 : येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेचं काही महत्त्वाचं काम काढताय? थोडं थांबा! कारण या महिन्यात बँका जवळपास अर्धा महिना बंद राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारच्या हक्काच्या सुट्ट्या तर आहेतच. पण त्यासोबतच अनेक सणांमुळे बँकांना कुलूप असेल. त्यामुळेच नाहक हेलपाटे टाळण्यासाठी बँकेत जाण्यापूर्वी ही यादी पाहणं नक्कीच फायद्याचं ठरेल.
August Bank Holidays 2026 : ऑगस्टमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद?
थोडक्यात सांगायचं तर, राज्यांनुसार सुट्ट्यांचे दिवस वेगवेगळे असणार आहेत. ४ ऑगस्टला त्रिपुरामध्ये ‘केर पूजा’ असल्याने बँका बंद असतील. तर ८ ऑगस्टला सिक्कीममध्ये ‘तेंडोंग ल्हो रम फाट’ या सणाची सुट्टी असेल.
दुसरीकडे, १३ ऑगस्टला मणिपूरमध्ये देशभक्त दिन पाळला जाईल. त्यानंतर १५ ऑगस्ट. आपला स्वातंत्र्य दिन! या दिवशी तर देशभरातील सर्वच शाखा बंद असतात. पुढे १९ ऑगस्टला त्रिपुरामध्ये महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त कामकाज बंद राहील.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महिन्याच्या शेवटी सलग सुट्ट्या आल्या आहेत. २५ ऑगस्टला मिलाद-उन-नबी आणि पहिल्या ओणमनिमित्त केरळ व आंध्र प्रदेशात बँका उघडणार नाहीत.
तर २६ ऑगस्टला ईद-ए-मिलाद आणि इतर सणांनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूरसह अनेक राज्यांत बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे तुमची महत्त्वाची कामं आताच मार्गी लावा. गैरसोय टाळायची असेल, तर डिजिटल बँकिंगचा जास्तीत जास्त वापर करा.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘दृश्यम’ चित्रपटालाही लाजवेल असा कट: पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेह १५ फूट खड्ड्यात पुरला
- ‘धमकी देणाऱ्याचं नाव सांगा, नाहीतर..’; बावनकुळे यांचा दिपकेला थेट इशारा
- ‘Googleही चुकीचं सांगतं’; सौरव दासचं कंगनाला जोरदार प्रत्युत्तर













