Share

‘धमकी देणाऱ्याचं नाव सांगा, नाहीतर..’; बावनकुळे यांचा दिपकेला थेट इशारा

भाजप धमकीच्या दाव्यानंतर बावनकुळे यांनी ‘नाव सांगा, अन्यथा बदनामी करू नका’ असा इशारा दिपकेला दिला.

Published On: 

Abhijit Dipke BJP Threat Claim Bawankule Warning

ठाणे : CJP संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) याने दावा केला आहे की, “मला भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती. मला सांगण्यात आले की येणार नसशील तर ठोकून काढू, आई-वडिलांना पाहून घेऊ.” महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या व्यक्तीने तुम्हाला धमकावले त्याचे नाव सांगा. जर तुम्ही नाव सांगू शकत नसाल, तर भाजपची (BJP) बदनामी करू नका.” असा थेट इशारा बावनकुळे यांनी दिपकेला दिला.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान आपल्याला धमक्या मिळाल्याचा आणि भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर आल्याचा दावा अभिजीत दिपकेने केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान आपल्याला “पक्षात सामील व्हा, नाहीतर ठोकून काढू,” असे सांगण्यात आले आणि आई-वडिलांना पाहून घेण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप दिपकेने केला. कितीही ऑफर्स आल्या तरी मी भाजपमध्ये सामील होणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

Abhijit Dipke BJP Threat Claim Bawankule Warning

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नातवंडांच्या वयाचा मी आहे. ३० वर्षांच्या तरुणाला तुम्ही किती धमक्या देणार?” असा सवाल दिपकेने केला. ‘जेन झी’ (Gen Z) संस्कृती बिघडवत असल्याच्या बाबा रामदेव यांच्या विधानावरही दिपकेने टीका केली. “आमच्या हक्काच्या मागण्यासाठी लढणे बदनामी आहे, तसे असेल तर आम्ही त्याचा सामना करू.”

अभिजित दीपिकेने रामदेव बाबांवर निशाणा साधत त्यांना आपली प्रोडक्ट (Product) विकण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, गुरुवारी ठाणे जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी दिपकेच्या आरोपांना उत्तर दिले. “भाजपची देशभरात कोट्यवधी सदस्य संख्या आहे. त्यामुळे, दिपके यांनी त्यांना नेमके कोणी धमकावले हे स्पष्टपणे सांगावे. जर तो संबंधित व्यक्तीचे नाव सांगू शकत नसेल, तर त्याने भाजपची बदनामी करू नये,” असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही