Share

१० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वीच सीजेपी नेत्यांना धक्का; दिल्ली पोलिसांकडून जुलैतील संसद मार्च हिंसाचाराची चौकशी

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने जुलैतील संसद मार्च हिंसाचाराची चौकशी सुरू केल्याने अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Published On: 

Abhijit Dipke

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या त्यांच्या नियोजित आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी २० जुलैच्या संसद मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने हा तपास हाती घेतला असून, यामध्ये या तीनही नेत्यांच्या अडचणी वाढून त्यांचीही चौकशी होऊ शकते.

संसद मार्चातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी बीएनएसच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. या हिंसाचाराला नेमके कोण जबाबदार होते, त्यांची भूमिका काय होती आणि हा प्रकार पूर्वनियोजित होता की घुसखोरांमुळे घडला, याचा सविस्तर तपास आता केला जाणार आहे. तसेच, पोलिसांवरील कथित हल्ले, तोडफोड आणि सार्वजनिक व पोलिसांच्या मालमत्तेचे झालेले नुकसान या बाजूनेही पोलीस तपास करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, दिल्ली पोलिसांनी यापूर्वी जुलैच्या हिंसाचार प्रकरणी दाखल केलेले १७ एफआयआर रद्द केले होते.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. याआधी त्यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरही याच मागणीसाठी आंदोलन केले होते. दिल्लीतील आंदोलनासाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली असता, जंतरमंतरवर आंदोलनासाठी १० दिवस अगोदर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी, सौरव दास, अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका यांच्याकडून आंदोलनाची तयारी सुरूच आहे.

दुसरीकडे, कथित निवडणूक घोटाळ्याप्रकरणी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे खासदारही दिल्लीत सलग तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. इंडिया आघाडीने काल जंतरमंतरवर तर आज कॅनॉट प्लेस येथे निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यादेखील पहिल्यांदाच या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने २० जुलैच्या संसद मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी सुरू केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही