Share

१ ऑगस्टपासून LPG गॅसचे नियम बदलले; आता ‘हा’ मेसेज दाखवल्याशिवाय घरपोच मिळणार नाही सिलेंडर!

१ ऑगस्टपासून गॅस वितरणाचे नियम बदलत आहेत. आता ग्राहकांना मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय घरपोच सिलेंडर मिळणार नाही, तसेच ई-केवायसी अनिवार्य केली आहे.

Published On: 

LPG Cylinder Rules - Delivery boy handing over gas cylinder to customer at home

LPG Cylinder: गॅस सिलेंडर बुक केलाय? पण तो घरी आल्यावर तुम्हाला मिळेलच, याची आता कोणतीही शाश्वती नाही. का? कारण १ ऑगस्टपासून गॅस वितरणाचे आणि बुकिंगचे नियम पूर्णपणे बदलत आहेत.

इंडियन ऑईल, एचपी आणि भारत गॅस यांसारख्या तेल कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. आता केवळ बुकिंग करून चालणार नाही. गॅस घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एक खास मेसेज दाखवणं सक्तीचं करण्यात आलंय. त्याशिवाय तुम्हाला तुमचा सिलेंडर घरपोच मिळणार नाही.

LPG Cylinder New Rules: ई-केवायसी आणि डिलिव्हरीचे नियम कडक

हा नवा नियम नेमका काय आहे?

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कंपन्यांनी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC) प्रणाली आता अधिक कडक केलीय. त्यामुळे तुम्ही जेव्हा गॅस बुक कराल, तेव्हा तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक वन-टाईम पासवर्ड (OTP) येईल. हाच पासवर्ड तुम्हाला डिलिव्हरी बॉयला द्यावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर, ओटीपी नाही, तर गॅस नाही.

दुसरीकडे, ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) सुद्धा आता अनिवार्य करण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप आपली केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांची सबसिडी तर अडकेलच, पण काही काळासाठी गॅस कनेक्शनही थेट बंद होऊ शकतं. त्यासाठी एजन्सीमध्ये जाण्याचीही गरज नाही. घरबसल्या अधिकृत ॲपवरून फेस-ऑथेंटिकेशनद्वारे तुम्ही ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकता.

याशिवाय, दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या गॅसचे नवे दर जाहीर करतात. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर हे दर ठरतात. त्यामुळे उद्या व्यावसायिक आणि १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. व्यावसायिक गॅसचा पुरवठा नेमका कुठे होतोय, याची ट्रॅकिंगही आता वाढवण्यात येणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही