Sudesh Berry: नव्वदच्या दशकात ‘बॉर्डर’ सिनेमा आणि ‘सुराग’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुदेश बेरी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अक्षरशः स्तुतिसुमनं उधळली आहेत. एवढंच नाही तर ‘कॉकरोच जनता पार्टी’वर त्यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू झाली आहे.
Sudesh Berry on PM Narendra Modi
‘मोदी विष्णूचे अवतार, मला त्यांचे पाय धुवायचेत’
‘अकंपनी अक्की’ या पॉडकास्टमध्ये बेरी यांनी अनेक खळबळजनक दावे केले. मोदींचं कौतुक करताना ते म्हणाले की, मला मोदीजींचे पाय धुवून ते पाणी प्यायचं आहे. मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही. पण जशी आपण देवाची पूजा करतो, तसाच मी त्यांचा आदर करतो. माझ्यासाठी ते भगवान विष्णूंचे अवतार आहेत. देशात रामराज्य आणण्याचं श्रेयही त्यांनी थेट मोदींनाच दिलं.
दुसरीकडे मोदींवर टीका करणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मोदींचा चहा संपूर्ण जगावर भारी पडलाय. पण इथे आपलेच लोक त्यांच्या मागे लागलेत. हे मोठे इंग्रजी बोलणारे लोक, ज्यांना साधं नावही धड लिहिता येत नाही, ते मोदींना शिव्या देतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
‘कॉकरोच जनता पार्टी’ वरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. जंतरमंतरवर बसून आंदोलन करणाऱ्यांना त्यांनी भिकारी आणि मेलेले आत्मे असं म्हटलंय. विशेष म्हणजे, या पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना चळवळीत येण्याची ऑफर दिली होती. पण आपण त्यांना थेट ब्लॉक केल्याचा मोठा गौप्यस्फोट बेरी यांनी केला आहे. हे लोक देशाला मागे खेचत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या नावे बनावट शिक्के; मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळ्याचा पर्दाफाश, आंतरराज्यीय टोळी गजाआड
- नीट पेपरफुटी आंदोलन: जंतर मंतरवरील आंदोलकांवरील गुन्हे मागे; पण ‘या’ विद्यार्थ्यांची सुटका नाही!
- लाडक्या बहिणींना झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मोठा धक्का













