Kangana Ranaut vs CJP: कंगना रनौत (Kangana Ranaut)आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच तापली आहे. सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कंगना सातत्याने आपली मते मांडत आली असून, तिने पुन्हा एकदा CJP ला लक्ष्य केले आहे. तिने विशेषतः CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास (Saurav Das) यांच्यावर निशाणा साधत दावा केला की, तो विद्यार्थी नाही, तर पत्रकार आहे.
आता सौरव दासने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, मी विद्यार्थी नाही पण मी ‘स्टूडेंट ऑफ लाईफ’ (student of life) आहे आणि कंगनानेही तसेच असावे असे त्यांना वाटते. कंगनावर टीका करताना तो पुढे म्हणाला की, गुगलही तिला चुकीची माहिती देते. मी २७ वर्षांचा आहे, २८ नाही. मी विद्यार्थी नाही. मी पत्रकार आहे. मी कधीच विद्यार्थी असल्याचा दावा केला नाही. मात्र, ‘स्टूडेंट ऑफ लाईफ’ असणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
Kangana Ranaut CJP Controversy
“आयुष्यात पुढे जाताना माणसाची समज विकसित होत जाते. केवळ वय वाढल्याने कोणी ‘स्टूडेंट ऑफ लाईफ’ बनत नाही, तर त्यासाठी सक्रियपणे शिकत राहणे गरजेचे असते. कंगनाने ही ‘स्टूडेंट ऑफ लाईफ’ सारखे जगायला पाहिजे. कंगना रनौत आणि CJP यांच्यातील हा संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे.
यापूर्वी कंगनाने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. तिने लोकांना संबंधित व्यक्तीबद्दल गुगलवर शोध घेण्याचे आवाहन केले होते, कारण तिला त्याचे वय २८ वर्षे असल्याचे दिसले आणि तो स्वतःला विद्यार्थी म्हणवून घेत आहे. CJP चे आंदोलन संपले असले तरी, कंगना आणि CJP यांमध्ये आता एक नवीन वाद सुरू झाला आहे.
दरम्यान, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. कंगनाने जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचे वर्णन केले आणि अभिजीत दिपके यांच्यावरही टीका केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- १ ऑगस्टपासून LPG गॅसचे नियम बदलले; आता ‘हा’ मेसेज दाखवल्याशिवाय घरपोच मिळणार नाही सिलेंडर!
- भिवंडी दुर्घटना : चार मजली इमारत कोसळली; ४ जणांचा मृत्यू, ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
- हायकोर्टाने कारवाईवर प्रश्न विचारले, तुकाराम मुंढेंचे अधिकारी थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये धडकले; मोठा खुलासा!













