‘लेक लाडकी’ योजनेच्या नियमात मोठा बदल; आता ‘महाडीबीटी 2.0’वरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार

लेक लाडकी योजनेच्या नियमात बदल करण्यात आला असून, आता कागदपत्रांची संख्या कमी करत महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Published On: 

Lek Ladki Yojana online application on MahaDBT portal

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: ‘लेक लाडकी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता या योजनेचा (Lek Ladki Yojana) लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांना ‘महाडीबीटी 2.0’ (MahaDBT 2.0) पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून, या प्रक्रियेसाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्याही आता कमी करण्यात आली आहे.

यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना जवळच्या अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाऊन अर्ज जमा करणे अनिवार्य होते. तिथे जमा झालेले अर्ज प्रकल्प स्तरावर गोळा करून तत्कालीन पोर्टलवर नोंदवले जात होते आणि त्यानंतर छाननी होऊन मंजुरी दिली जात होती. मात्र, आता शासनाच्या विविध योजनांमधील सुसूत्रीकरणाच्या सूचनांनुसार या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे.

यासाठी नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) तयार करण्यात आली आहे. नव्या प्रणालीमुळे आता अर्जदारांना स्वतः घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. अर्जाची नोंदणी, छाननी, तसेच अर्ज आणि लाभ मंजुरी या सर्व प्रक्रियांमध्ये आता सुसूत्रीकरण आणले गेले आहे. याशिवाय, अर्जदारांना त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (Status) ऑनलाइन पाहता येणार आहे.

या ऑनलाइन व्यवस्थेमुळे विशेषतः ज्या भागात अंगणवाडी केंद्रे कार्यान्वित नाहीत, तिथल्या नागरिकांची अर्ज करताना होणारी गैरसोय टळणार आहे. राज्यातील कोणत्याही क्षेत्रातील रहिवासी आता या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. योजनेची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय याआधीच झाला होता. आता अर्ज प्रक्रियाही ऑनलाइन झाल्याने अंमलबजावणीतील मोठा टप्पा पूर्ण झाला आहे.

‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 2,98,695 लाभार्थ्यांना पहिला लाभ देण्यात आला असल्याची माहितीही स्पष्ट करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही