Aditi Tatkare । विधानसभेपूर्वी महायुतीने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) आणली. या योजनेचा महायुतीला खूप मोठा फायदा झाला. या योजनेचा लाभ यापुढेही असाच मिळावा यासाठी महिलांनी देखील महायुतीला निवडणुकीत चांगला प्रतिसाद दिला.
या योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत. परंतु, त्यापूर्वी राज्य सरकारने अपात्र महिलांकडून आतापर्यंत मिळालेले लाभ परत घेणार असल्याचे सांगितले. यामुळे महिलांना मोठा धक्का बसला होता.
यावर आता पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचं मूल्यमापन करणे यात काही नवीन नाही. इतर योजनेत देखील प्रत्येक वर्षी मूल्यमापन करण्यात येते. या योजनेच्या अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
दरम्यान, राज्य सरकारने नुकतेच या योजनेच्या अपात्र महिलांना दिलेले सर्व लाभ परत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा सरकारने या योजनेचे लाभ परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकार पैसे परत घेणार की नाही? याबाबत अजूनही महिलांच्या मनात संभ्रम कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या :