Sandeep Kshirsagar । खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. आजच त्याला बीड न्यायालयाने आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतोय. मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी सध्या राजकीय वर्तुळातून केली जाऊ लागली आहे. दरम्यान, कालच वाल्मिक कराड विरोधातला एक मोठा पुरावा समोर आला आहे. यावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“संतोष देशमुख हत्याप्रकरणी मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की वाल्मिक कराडच मास्टरमाइंड आहे. खंडणीच्या गुन्ह्यामुळे हा गुन्हा झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड दिसत आहे. कराड एवढा मोठाही नाही. त्याला मंत्रिपदामुळे संरक्षण मिळत आहे,” असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
Sandeep Kshirsagar on Walmik Karad
तसेच मराठा नेते रामभाऊ गायकवाड यांनी जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना राज्यात फिरू देऊ नका. दगडं घेऊन त्यांच्या समोर गेलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :