Mohan Bhagwat on Gen Z : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज ‘जनरेशन झेड’ (Gen Z) शी संवाद साधला आणि त्यांच्या स्वभावावर व मानसिकतेवर प्रकाश टाकला. ‘जनरेशन झेड’बद्दल बोलताना त्यांनी नमूद केले की, शिक्षण क्षेत्रात अजूनही खूप काही करणे बाकी आहे. अशा उपाययोजनांच्या अभावामुळेच आंदोलने (Protest) झाली. संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. “आमची पिढी मोठ्यांनी सांगितलेले फक्त ऐकून घ्यायची, आम्ही कधीही त्यांना प्रश्न विचारले नाहीत. आताची पिढी प्रश्नाला उत्तर मागते. त्यांना लॉजिकल उत्तर हवे आहे आणि प्रेमही हवे आहे, असे मोहन भागवत म्हणाले. तसेच जेनजीने आंदोलन करू नये असे मी म्हणणार नाही. परंतु ते आंदोलन कशा प्रकारे करावे, याचा योग्य मार्ग संविधानात नमूद केला आहे.
“आंदोलन करणे हा देखील संवादाचाच एक प्रकार आहे. आपण बसतो, बोलतो आणि चर्चा करतो. जर प्रश्न सुटला नाही, तर कदाचित मी माझा आवाज उठवेन. लोकशाहीमध्ये आंदोलन हा एक वैध मार्ग आहे. लोकशाहीत भिन्न दृष्टिकोन असतात, ‘पूर्वपक्ष’ (मूळ युक्तिवाद) आणि ‘उत्तरपक्ष’ (प्रति-युक्तिवाद); प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने पाहतो. ‘जनरेशन झेड’ने आंदोलन करू नये असे मी म्हणणार नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे आणि त्यात ते कसे करावे याचे मार्गदर्शन दिले आहे. आंदोलनांचा उद्देश व्यवस्था सुधारणे हा असावा, ती ‘आपल्या’ किंवा ‘तुमच्या’ विरोधात नसावीत. जेव्हा नको त्या गोष्टी घडतात तेव्हा चुका होतात. कोणाची चूक आहे हा प्रश्न नंतर येतो, पण संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे,” असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
Mohan Bhagwat speaks about Gen Z protests
“आंदोलन करणे म्हणजे देशद्रोह नव्हे. ते आपलेच लोक आहेत. त्यांना आपलेपणाची भावना हवी असते. मला वाटते की नवीन पिढ्या ‘जनरेशन झेड’ आणि ‘जनरेशन अल्फा’ अधिक प्रामाणिक आहेत. देशभक्तीसाठी अशी प्रामाणिकता अत्यंत महत्त्वाची आहे. जंतरमंतर येथील लाठीमाराबाबत त्यांच्याकडे सविस्तर माहिती नाही, परंतु कुठे चूक झाली हे तपासण्याची गरज त्यांनी मान्य केली. “आमच्याकडे संपूर्ण चित्र नाही, आम्ही केवळ बातम्यांच्या आधारे बोलत आहोत. ‘जनरेशन झेड’वर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे मोहन भागवत म्हणाले.
शिक्षण हा काही व्यवसाय नाही.
१५ लाख शाळांपैकी १ लाख शाळांमध्ये शौचालये नाहीत. मग मुलींनी शिक्षण कसे घ्यावे? १५ हजार शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही ही राष्ट्रीय आणीबाणी आहे का? भागवत यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी त्यावर आपली भूमिका मांडली. शिक्षण हा काही व्यावसायिक उद्योग नाही. शिक्षण व्यवस्था अशी असावी की ज्यामुळे शिक्षण सर्वांना उपलब्ध होईल. ही एक सामूहिक जबाबदारी आहे आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे, त्यांनी त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. अनेक गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या शाळा सुरू करण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र आले आहेत.
शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या प्रक्रियेत आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे आणि शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण मिळायला हवे. मात्र, मूळ मुद्दा हा आहे की, पण बेसिक म्हणजे शिक्षण हे पुढची पिढी तयार करण्यासाठी देत आहोत, पैसे कमाविण्यासाठी नव्हे, असे सांगतानाच तुम्ही पण एक प्रकल्प घेऊन या, ज्यामध्ये समाजाला ठीक करता येईल. तर आणखी एक प्रयत्न होईल, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
आंदोलनाशिवायही हे शक्य आहे
१० लाख शिक्षकांची जागा रिक्त आहेत. शिक्षण पद्धतीसाठी समिती तयार होते, पण काम होत नाही, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. आम्हीही एकूण निधीपैकी ६ टक्के निधी शिक्षणासाठी देण्याची मागणी करतो, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने पूर्ण शिक्षण व्यवस्था चालवण्याची गरज नाही. केवळ अर्थसंकल्पाच्या बळावरच सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. योग्य ती जाणीव किंवा वृत्ती जागृत करण्याची गरज आहे. आंदोलनाशिवायही हे होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना चिन्ह लढाईत नवा ट्विस्ट; सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीने राजकीय चर्चांना उधाण
- ‘वडिलांसारखाच तुझा गेम वाजवणार’; राष्ट्रवादीच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी
- ‘जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत’ – अभिजीत दिपके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












