Share

राज ठाकरेंवर रील बनवणाऱ्या महेश मोटेला मनसेचा दणका; तोंडाला काळं फासून काढायला लावल्या उठाबशा

राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह रील बनवल्याने पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महेश मोटेला तोंडाला काळे फासून राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी मागायला लावली.

Published On: 

MNS workers action against social media influencer mahesh mote over Raj Thackeray reel

पुणे– पुण्यातील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह रील बनवणे चांगलेच महागात पडले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या इन्फ्लुएन्सरला पकडून त्याला राज ठाकरे यांच्या फोटोसमोर नाक घासायला लावले. महेश मोटे असे या इन्फ्लुएन्सरचे नाव असून, कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासत आणि डोक्यावर चपला ठेवून त्याला उठाबशा काढायला लावल्याची घटना समोर आली आहे.

मनसे नेत्यांनी महेश मोटे याचा एक माफीनामा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये मोटे भीतीने रडत असल्याचे दिसत आहे. त्याने हात जोडून राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांची विनाअट माफी मागितली असून, आपल्याला आणखी त्रास न देण्याची विनंती केली आहे. “माझ्याकडून राज साहेबांबद्दल अनावधानाने काही चुकीचे बोलले गेले, तसेच शुभम दादा आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांबद्दलही मी चुकीचे बोललो. आज मला माझ्या चुकीचा पश्चात्ताप होत आहे. त्या रीलमुळेच मी या अडचणीत सापडलो आहे. मी मनसे आणि तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो,” असे मोटे याने या माफीच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

मनसे स्टाईल ‘महाप्रसाद’: इन्फ्लुएन्सरवर पुण्यात कारवाई

हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उपविभाग प्रमुख शुभम जगदाळे यांनी या घटनेबाबत माहिती दिली. मोटे याने सुमारे १५ दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप जगदाळे यांनी केला. मोटे गेल्या १५-२० दिवसांपासून केरळमध्ये होता. तो पुण्यात परतल्याची आणि कात्रज भागात असल्याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला कात्रजमधील एका उद्यानातून पकडले आणि पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आणले.

कार्यालयात आणल्यानंतर मोटे याला मनसे स्टाईलने ‘महाप्रसाद’ देण्यात आल्याचे जगदाळे यांनी सांगितले. या घटनेचे समर्थन करत, राज ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या प्रत्येकाची हीच गत होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

“आम्ही त्याला आमच्या कार्यालयात आणले आणि आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर झोपवून त्याला माफी मागायला लावली. खऱ्या मनसे स्टाईलने आम्ही त्याला आमच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले, ज्याला तुम्ही ‘महाप्रसाद’ म्हणू शकता. जर कोणी राज साहेबांविरोधात अशी वक्तव्ये केली, तर मनसे याच पद्धतीने उत्तर देईल,” असे जगदाळे यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही