दिल्ली : काही दिवसांपूर्वी, राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘नीट’ (NEET) पेपरलीक प्रकरणी चिंता व्यक्त करण्यात आली आणि तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी थेट भाष्य करत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एका महिन्याहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनानंतर अखेरीस धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आंदोलनादरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’ने संसदेच्या दिशेने मोर्चा काढला होता. या वेळी काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, ज्यामध्ये अनेकजण जखमी झाले.
Prithviraj Chavan demand Amit Shah’s resignation
दिल्लीतील घटनांनंतर, बिहारमध्येही एक आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. तेथे आंदोलकांना धमकावण्यासाठी एके-४७ (AK-47) रायफलचा धाक दाखवण्यात आला आणि या घटनेचे फोटो व व्हिडिओ समोर आले.
दिल्लीतील लाठीचार्ज आणि बिहारमधील आंदोलनादरम्यान एके-४७ चा वापर, या दोन्ही गोष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरूनच झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, “सभागृहासमोर यायला तुम्ही घाबरत आहात, तुम्ही येत नाही, कोण पळपुटं आहे मग? आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही उत्तरं द्या. पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे. उत्तर दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काही म्हणणार नाही, पण तुम्ही करू शकत नाही ना. गोळीबार झाला की नाही, पॅलेट गन वापरल्या की नाही? एका मुलाचा डोळा गेला की नाही? बिहारमध्ये एके47 वापरल्या. कुणी तरी आदेश दिला असेल ना. तुम्ही सांगा ना मी नाही दिला. मला माहिती नाही कुणी केलं. मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात, म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आधी उत्तरं द्या आणि आमचं समाधान करा ना. तुम्ही सभागृहात आला नाही हा घटनेचा अपमान आहे. लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे. विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका.”
📌 महत्वाच्या बातम्या
- “2029 पूर्वीच PM मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल” : संजय राऊत
- कुंभमेळा लुटण्यासाठी आलेला फडणवीसांचा एजेंट गिरीश! काँग्रेसचा घणाघात
- ‘ताल’साठी सुभाष घाई यांनी ऐश्वर्याला म्हटलं होतं, “तुला बरबाद करून टाकेल…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












