Share

ललित प्रभाकरला ‘कसाब’च्या भूमिकेत पाहून प्राजक्ता माळीची खास पोस्ट; म्हणाली, ‘मला तू आदित्यपेक्षा…’

‘प्रहार’ सिनेमातील ललित प्रभाकरची कसाबची भूमिका पाहून अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास पोस्ट शेअर केली असून, आदित्यपेक्षा कसाबच जास्त आवडल्याचे म्हटले आहे.

Published On: 

Prajakta Mali on Lalit Prabhakar Kasab

प्रतिनिधी, 2 ऑक्टोबर: अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आगामी ‘प्रहार’ या बहुचर्चित सिनेमात दहशतवादी कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ललितने सर्वांनाच थक्क केले आहे. त्याचा हा ट्रेलर पाहून अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सोशल मीडियावर त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत एकत्र काम केल्यापासून प्राजक्ता आणि ललित यांची खूप चांगली मैत्री आहे. ‘प्रहार’चा ट्रेलर समोर आल्यानंतर प्राजक्ताने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘मला तू आदित्यपेक्षा कसाबच्या भूमिकेतच का जास्त आवडलाय कळेना’. या मालिकेत ललितने आदित्य हे पात्र साकारले होते.

Prajakta Mali on Lalit Prabhakar 

प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘असं वाटतंय हा ट्रेलर तुझ्यासाठी बनलाय, ललित. पण तुझ्यामुळेच मी सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू शकणार नाहीए.’ ललित आणि प्राजक्ताच्या आगामी ‘शुभमंगलम जोडी दंगलम’ या सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्राजक्ताने पहिल्या दिवशी सिनेमा पाहता येणार नसल्याचे म्हटल्याची चर्चा आहे.

‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा २६/११ च्या खटल्यावर आधारित आहे. यामध्ये राजकुमार राव सरकारी वकील उज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अविनाश अरुण धावरे यांनी या सिनेमाची कथा पडद्यावर मांडली असून, यात वामिका गब्बी हिचीही महत्त्वाची भूमिका आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

ललित प्रभाकर आगामी 'प्रहार' या बहुचर्चित सिनेमात दहशतवादी कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही