Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) साठी आजचा दिवस खास आहे, कारण ती तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहमीप्रमाणे तिने हा दिवस आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेट केला. मात्र, त्याच वेळी एका महत्त्वपूर्ण वैयक्तिक निर्णयाची घोषणा करून तिने आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकितही केले.
प्राजक्ताने आपल्या वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन आणि तुळजाई मातेचे आशीर्वाद घेऊन केली. या दिवसाचे फोटो शेअर करताना तिने आपल्या जीवनशैलीबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल चाहत्यांना माहिती दिली.
Prajakta Mali announces vegan lifestyle decision
प्राजक्ता माळीने ‘व्हेगन’ (Vegan) (पूर्णपणे वनस्पती-आधारित आहार घेणारी) बनण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागचे कारण तिने स्पष्ट केले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिने स्पष्ट केले की, “हा निर्णय केवळ स्वतःच्या इच्छेने घेतलेला नसून तिच्या शरीराने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणे बंद केले आहे. ज्यामुळे तिला सतत खोकल्याचा त्रास होत होता.”
“भविष्यात कॉफी आणि चहाही घेणार नाही, असे प्राजक्ता माळीने जाहीर करून चाहत्यांना आश्चर्यचकित धक्का दिला. तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, तिचे शरीर आता काही विशिष्ट ‘तामसिक’ पदार्थ स्वीकारत नाही.
आपल्या निर्णयाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, “मी आता अधिकृतपणे ‘क्रुएल्टी-फ्री’ झाले आहे.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण? फडणवीस, शिंदे की ठाकरे; उत्तराने सगळेच चक्रावले
- ‘तुम्ही गद्दार म्हणत राहा, आम्ही कामातून उत्तर देऊ’; रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा
- महिला आरक्षण कायदा अजून लागू का नाही? किरण रिजिजूंना काँग्रेसचा थेट सवाल













