Share

तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण? फडणवीस, शिंदे की ठाकरे; उत्तराने सगळेच चक्रावले

तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर त्यांनी कोणाचंही नाव न घेता उत्तर देणं टाळलं, तर खानपानाच्या गुणवत्तेबाबत कठोर कारवाईचा इशाराही दिला.

Published On: 

Tukaram Mundhe on favourite Maharashtra CM

पुणे : तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून या विभागाने नव्या जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.

अलीकडील एका मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांपैकी त्यांचा आवडता मुख्यमंत्री (Chief Minister) कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनी कोणाचेही नाव घेण्याचे टाळले आणि त्या प्रश्नाला बगल दिली.

तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीच्या आणि विविध नियुक्त्यांच्या संदर्भात विचारले असता, त्यांनी कोणतेही विशिष्ट नाव न घेता केवळ “मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो,” असे उत्तर दिले.

Tukaram Mundhe on favourite Maharashtra CM

मुलाखतीदरम्यान बोलताना मुंढे यांनी इशारा दिला की, अन्न आणि पेयांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी नमूद केले की,
“खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून, गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत.”

पुढे मुंढे यांनी सांगितले की, पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. दूध, पनीर, खाद्यतेलांप्रमाणेच ‘अल्कोहोलिक’ आणि ‘नॉन अल्कोहोलिक’ पेयांचीही तपासणी करणार आहे. खानपानाच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.” असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त, प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक आणि अंतरात्म्याला ‘फॉलो’ केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला यावेळी तुकाराम मुंढे यांनी दिला.

‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी ही मुलाखत घेतली, ज्यामध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही