मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पंतप्रधानाच्या भेटी-गाठीवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदेच दिसतात. पंतप्रधानांची भेट घेतली म्हणून मोदी हे शिंदे यांचे ‘बॉस’ झाले का? असा सवाल कदम यांनी केला आहे.
मुख्यमंत्री असताना जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती, तेव्हा पंतप्रधान त्यांचे ‘बॉस’ झाले होते का? असा टोलाही कदम यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटू शकतो. तुम्ही गद्दार म्हणत राहा, तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, असा टोमणा कदम यांनी ठाकरे यांना मारला.
Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray
पुढे कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत, याची जाणीव ठेवावी. टीका करत बसा, आम्ही कामातून उत्तर देऊ. अधिवेशन काळात देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांची आपल्या पिल्लाने बुके घेऊन भेट घेतली, याची माहिती घ्या. मग फडणवीस व अन्य नेते तुमच्या पिल्लाचे बॉस झाले का? असा सवालही कदम यांनी केला.
अधिवेशन काळात आदित्य ठाकरे यांच्या भाजप नेत्यांच्या भेटींचा रामदास कदम यांनी दाखला दिला आहे. ते म्हणाले की, “दुसऱ्यांकडे एक बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदेंविषयी केवळ द्वेष आहे.”
उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?
चिंता नको, मी तुमच्या पाठिशी आहे. हा धमकीवजा संदेश मोदींनी नेमका कोणाला दिलाय? आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा घाबरून तुमची पळापळ का होतेय? का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जाताय?” अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
“हा संपूर्ण घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार. ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेत आहे. संविधानाबद्दल प्रेम असणाऱ्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशभक्तांना मी आवाहन करतोय की, ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंतप्रधानांना आपल्या देशातले तरुण भेटत नाहीत, अगदी रात्री मध्यरात्री एकदम Friends म्हणून त्यांना Instagram वरून संदेश देतात. आता Instagram वरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे, एवढी यांची आता हालत खराब झाली आहे. जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात, ते यांनी करून दाखवलं. कारण एवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाट्याला आलेली आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- महिला आरक्षण कायदा अजून लागू का नाही? किरण रिजिजूंना काँग्रेसचा थेट सवाल
- उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात! ‘ती’ धमकी नेमकी कुणाला? विचारला मोठा सवाल
- ‘सदिच्छा भेट’ की मोठी राजकीय हालचाल? ‘या’ गटाचे खासदार मोदींना भेटणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












